मुंबई : नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या फँड्री चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत यशस्वी पाऊल टाकलेली अभिनेत्री म्हणजे राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) तिने पहिल्याच चित्रपटामध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. काही दिवस ही शालू अभिनय क्षेत्रापासून थोडी दूर गेली होती. मात्र, आता परत एकदा जब्याची शालू चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर शालूने तिच्या अदांनी अनेकांना घायाळ केलं आहे. (Rajeshwari Kharat’s latest dance video goes viral on social media)
फँड्री चित्रपटात शालूची भूमिका साकरणाऱ्या राजेश्वरी खरातने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून राजेश्वरी सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहे. राजेश्वरीच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांची मोठी पसंती मिळतेय आणि शालूचा हा बदलेला अंदाज चाहत्यांना जबरदस्त आवडलेला दिसत आहे.
नुकताच शालूने सोशल मीडियावर एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये शालू ‘बहुत कठिन है डगर पनघट की’ या जान्हवी कपूरच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. नागराज मंजुळेना फँड्री चित्रपटात जो चेहरा पाहिजे होता तो त्यांना राजेश्वरीच्या रूपाने मिळाला. राजेश्वरीने देखील आपल्या उत्तम अभिनयातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, फँड्री शालूचे आताचे रूप पाहिले की चाहत्यांना विश्वासच बसत नाही.
संबंधित बातम्या :
Video : ‘सारी इस्कटून जिंदगी मी पाहिली.. तरी झाली कुठ चुक मला कळना…’, शालूचा इश्किया अंदाज पाहाच!
Video : ‘भास वाटतोया, हे खरं का सपान…’; ‘फँड्री’ची शालू ग्लॅमरस झाली, व्हिडीओ पाहिला का?
(Rajeshwari Kharat’s latest dance video goes viral on social media)