मुंबई : सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांना रविवारी म्हणजेच 27 डिसेंबरला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शुक्रवारी त्यांना हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. रक्तदाब उच्च होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता रजनीकांत यांची प्रकृती सुधारत आहे आणि त्याचा बीपीही नियंत्रणात आला आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज आला आहे. मात्र, रजनीकांत यांची अजूनही काळजी घेतली जात आहे. (Rajinikanth discharged from hospital)
रजनीकांत ‘अन्नाथे’ (Annaatthe) चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेल्या 12 दिवसांपासून हैदराबादमध्ये आहेत. 25 डिसेंबर रोजी अचानक त्याची तब्येत बिघडली होती त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी नुकतेच एक निवेदन प्रसिद्ध केले आहे, ज्यात त्यांनी सांगितले की, रजनीकांत यांची तब्येत बरी आहे, म्हणूनच त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज दिला जात आहे. ते म्हणाले की, सध्या रजनीकांत यांना विश्रांतीची आवश्यकता आहे.
रजनीकांत यांच्या चाचण्या करण्यात आल्या त्या सर्व नॉर्मल आल्या आहेत. त्यानंतरच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, त्यांना कोणालाही भेटण्याची परवानगी देण्यात आली नाही.
कोरोना काळातील लॉकडाऊननंतर जवळपास सर्व चित्रपटांचे चित्रीकरण ठप्प झाले होते. आता देशात अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असून, सर्व चित्रपटांचे चित्रीकरण पुन्हा एकदा सुरू केले जात आहे. रजनीकांत यांच्याविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. रजनीकांत हे सध्या अन्नाथे या चित्रपटाचे शूटिंग करत होते. जिथे चित्रपटाच्या सेटवर 8 लोक कोरोना पॉझिटिव्ह आले होते.
ज्यानंतर चित्रपटाचे शूटिंग बंद करण्यात आले होते. हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये 14 डिसेंबरपासून या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले होते. ज्यानंतर सेटवर कोरोना पॉझिटिव्ह रूग्न सापडल्यानंतर शूटिंग थांबविण्यात आले आहे. शूट सुरू होण्यापूर्वी सन पिक्चर्स, प्रॉडक्शन हाऊसने चार्टर्ड विमानाची व्यवस्था केली होती. रजनीकांत यांच्यासह त्यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांतही त्यांच्यासोबत हैदराबादला आली होता. प्रोडक्शन हाऊसने ऐश्वर्या आणि वडील रजनीकांत यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होता.
संबंधित बातम्या :
रजनीकांत निवडणूक लढवणार नाहीत, पक्षाचीही माघार!
Rajinikanth Health Update | ‘थलायवा’च्या प्रकृतीत काहीशी सुधारणा, लवकरच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता!
(Rajinikanth discharged from hospital)