चेन्नई : 27 डिसेंबर 2023 | सुपरस्टार रजनीकांत यांची पत्नी लता यांनी फसवणुकीच्या प्रकरणात अखेर मौन सोडलं आहे. ‘कोचडायन’ या तमिळ चित्रपटाशी संबंधित झालेल्या एका फसवणुकीच्या प्रकरणात लता यांचं नाव चर्चेत आलं होतं. याप्रकरणी त्यांना बेंगळुरूतील कोर्टाने दिलासासुद्धा दिला होता. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी फसवणुकीच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. सेलिब्रिटी असल्याची किंमत चुकवावी लागतेय, असं त्या म्हणाल्या आहेत.
“माझ्यासाठी हे एका लोकप्रिय व्यक्तीचा छळ, शोषण आणि अपमानाचं प्रकरण आहे. सेलिब्रिटी असल्याची ही किंमत मोजावी लागतेय. त्यामुळे प्रकरण जरी मोठं नसलं तरी त्याची बातमी खूप मोठी होते. कोणतीही फसणवूक झाली नाही. माझा पैशांशी काहीही संबंध नाही”, असं म्हणत त्यांनी आरोप फेटाळले आहेत.
चेन्नईमधल्या एका ॲड ब्युरो ॲडवर्टायझिंग प्रायव्हेट लिमिटेडने 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या अधिकारांवरून लता यांच्याविरोधात फसवणुकीचा खटला दाखल केला होता. चित्रपट निर्मात्यांपैकी एक असलेल्या मीडिया वनला 10 कोटी रुपये उधारीने दिले होते. याप्रकरणी रजनीकांत यांच्या पत्नी लता यांनी गँरटरच्या रुपात हस्ताक्षर केलं होतं, असा आरोप या याचिकेत करण्यात आला होता.
#WATCH | On a cheating case filed against her, wife of Superstar Rajinikanth, Latha Rajinikanth says, “For me, it’s a case of humiliation and harassment and exploitation of a popular person. This is the price we pay for being celebrities. So there may not be a big case, but the… pic.twitter.com/oIzOQUZDYK
— ANI (@ANI) December 27, 2023
याविषयी लता पुढे म्हणाल्या, “ज्या पैशांबद्दल बोललं जातंय, त्यात माझं काहीच घेणं-देणं नाही. हे प्रकरण मीडिया वन आणि इतर संबंधित लोकांमधील आहे. याविषयी त्यांनी आधीच करार केला आहे आणि त्यांच्यामधील हा संपूर्ण प्रकरण आहे. गँरटरच्या रुपात मी हे सुनिश्चित केलं होतं की त्यांनी पैशांची परतफेड केली असेल. त्यानंतर मला फसवण्यात आलं आहे.” काही रिपोर्ट्सनुसार मंगळवारी एका अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने त्यांना एक लाख खासगी बाँड आणि 25 हजार रुपये रोख जमा केल्यानंतर जामीन मंजूर केला होता.