बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या मेहनतीच्या जोरावर मोठे झाले आहेत. फिल्म इंडस्ट्रीत त्यांचे कोणीही गॉडफादर नसतानाही त्या कलाकारांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीत वेगळं स्थान निर्माण केलं आहे. यात बऱ्याच अभिनेत्यांच्या नावांचा समावेश आहे.
प्रेक्षकांच्या मानावर राज्य करणारा अभिनेता
फिल्म इंडस्ट्रीत प्रसिद्ध असलेले, प्रेक्षकांच्या मानावर राज्य करणाऱ्या अभिनेत्यांना त्याच्या खऱ्या आयुष्यात तसेच या यशापर्यंत पोहोचण्यात किती मेहनत घ्यावी लागली असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. असाच एक अभिनेता आहे ज्याच्या चित्रपटाचे , त्याच्या अभिनयाचे सर्वजण फॅन आहेत. तो अभिनेता म्हणजे राजकुमारराव.
बिस्किट आणि फ्रुटीवर दिवस काढले
नुकत्याच झालेल्या पॉडकास्टमध्ये त्याने त्याच्या खासगी आयुष्यासंबंधीत काही गोष्टी सांगितल्या. त्याच्या संघर्षाविषयी सांगताना राजकुमार राव म्हणाला की त्याच्या घराची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यानं, तीन वर्ष त्याच्या शाळेच्या शिक्षकानं त्याची फी भरली होती. त्याची आई कधी-कधीतर त्याच्या शाळेची पुस्तक घेऊन जाण्यासाठी आणि ट्यूशनसाठी नातेवाईकांकडून पैसे घ्यायची.
राजकुमार रावनं यावेळी सांगितलं की एक वेळ अशी होती जेव्हा त्याच्या बॅंक अकाऊंटमध्ये फक्त 18 रुपये होते. त्याच्या स्ट्रगलच्या काळात त्यानं बिस्किट आणि फ्रुटीवर दिवस काढले होते. पण आज हा अभिनेता बॉलिवूडवर राज्य करताना दिसतोय. राजकुमारचे जवळपास सर्वच चित्रपट सुपरहिट ठरलेले आहेत.
8.1 मिलियन फॉलोवर्स
राजकुमारचा चित्रपट ‘स्त्री 2’ नं जगभरात 850 कोटींचं कलेक्शन केलं. त्याची लोकप्रियता ही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. इतकंच नाही तर त्याचे चाहते हे फक्त भारतात नाही तर परदेशातही आहेत. राजकुमार रावचे इन्स्टाग्रामवर 8.1 मिलियन फॉलोवर्स आहेत.
राजकुमार रावनं 2010 मध्ये करिअरची सुरुवात केली होती. आज तो इंडस्ट्रीमधील एक लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. पण करियरच्या सुरुवातीला त्यांनं अनेक चित्रपटांमध्ये छोट्या-छोट्या भूमिका साकारल्या आहेत.
आमिर खान आणि करीना कपूरच्या तलाश या चित्रपटामध्ये देखील त्यानं एक भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्यानं आमिर खानच्या असिस्टंटची भूमिका साकारली होती. पण त्याची भूमिका ही फार छोटी होती पण त्याच्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली आणि आज बड्या बड्या प्रोडक्शन हाऊसची तो पहिली पसंती आहे.