Rajshri Deshpande |”सेक्रेड गेम्सनंतर फक्त इंटिमेट सीन्ससाठीच..”; मराठमोळ्या अभिनेत्रीकडून खंत व्यक्त

| Updated on: Jul 20, 2023 | 12:10 PM

"त्यावेळी एस. दुर्गा या चित्रपटाचीही जोरदार चर्चा होती. त्यामुळे प्रत्येकाला असं वाटायचं की मी तशा भूमिका साकारण्यासाटी किंवा इंटिमेट सीन्स करण्यासाठी स्वत:हून इच्छुक आहे. त्यामुळे अशा भूमिकांच्या चेकलिस्टमध्ये ते माझं नाव मलाच न विचारता घ्यायचे."

Rajshri Deshpande |सेक्रेड गेम्सनंतर फक्त इंटिमेट सीन्ससाठीच..; मराठमोळ्या अभिनेत्रीकडून खंत व्यक्त
Rajshri Deshpande
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई | 20 जुलै 2023 : नेटफ्लिक्सवरील ‘ट्रायल बाय फायर’ या वेब सीरिजमध्ये झळकलेली अभिनेत्री राजश्री देशपांडे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या करिअरविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. ‘सेक्रेड गेम्स’च्या यशानंतर कशा पद्धतीने तिला फक्त इंटिमेट सीन्सच्या भूमिकांसाठी कॉल्स येऊ लागल्या, याविषयी तिने सांगितलं. ‘फिल्म कम्पॅनियन’ला दिलेल्या या मुलाखतीत राजश्रीने ‘सेक्रेड गेम्स’नंतर काही वर्षे ब्रेक घेण्याविषयीही सांगितलं. आपल्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने गावाता शाळा बांधण्यासाठी तिने हा ब्रेक घेतला होता.

‘सेक्रेड गेम्स’ या सीरिजच्या वेळीच राजश्रीचा मल्याळम चित्रपट ‘एस दुर्गा’सुद्धा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्यामुळे इंडस्ट्रीतील बऱ्याच लोकांनी असा अर्थ काढला की राजश्री स्वत:हून वादग्रस्त आणि इंटिमेट भूमिका साकारण्यासाठी इच्छुक आहे. यावेळी तिला ज्या भूमिकांचे ऑफर्स आले, त्याच्यासोबत स्क्रीप्टसुद्धा नव्हते. “मला कॉलवर असं स्पष्ट सांगितलं जायचं की यामध्ये इंटिमेट सीन्स आहेत पण ते करण्यासाठी तू कम्फर्टेबल आहेस ना? स्क्रिप्ट कशी आहे, कोण इतर कलाकार आहेत, दिग्दर्शक कोण याची काहीच माहिती मला मिळायची नाही”, असं ती म्हणाली.

हे सुद्धा वाचा

“त्यावेळी एस. दुर्गा या चित्रपटाचीही जोरदार चर्चा होती. त्यामुळे प्रत्येकाला असं वाटायचं की मी तशा भूमिका साकारण्यासाटी किंवा इंटिमेट सीन्स करण्यासाठी स्वत:हून इच्छुक आहे. त्यामुळे अशा भूमिकांच्या चेकलिस्टमध्ये ते माझं नाव मलाच न विचारता घ्यायचे. तू या भूमिकेसाठी योग्य आहेस, तू करू शकतेस.. असं थेट म्हणायचे. तिथे स्क्रिप्टशी काहीच घेणंदेणं नसायचं”, असं तिने पुढे सांगितलं.

या मुलाखतीत राजश्रीने पटकथांविषयी तिचं स्पष्ट मत मांडलं. ती म्हणाली, “सध्या हे सगळं मॅगी न्यूडल्ससारखं झालं आहे. तुम्ही दोन महिन्यांत स्क्रिप्ट लिहिता, दोन महिन्यांत शूटिंग पूर्ण करता, दोन महिन्यात पोस्ट प्रॉडक्शनचं काम पूर्ण होतं आणि सातव्या महिन्यात चित्रपट प्रदर्शित होतो. सध्या अनेक लोकं हाच फॉर्म्युला पाळत आहेत. पण मला असं वाटत नाही की कलेला कोणताच फॉर्म्युला असतो. ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला दररोज आणि प्रत्येक सेकंदाला समजून घ्यायची आहे.”

नेटफ्लिक्सच्या ‘ट्रायल बाय फायर’ या सीरिजमध्ये राजश्रीने नीलम कृष्णमूर्तीची भूमिका साकारली आहे. 1997 मध्ये झालेल्या उपहार सिनेमा दुर्घटनेवर ही सीरिज आधारित आहे. 13 जून, 1997 रोजी दुपारी 3 वाजता दिल्लीतील उपहार सिनेमामध्ये ‘बॉर्डर’ चित्रपटाचा शो सुरू असताना आग लागली. या आगीमुळे थिएटरमध्ये अडकून सुमारे 59 लोकांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. तर चेंगराचेंगरीमुळे 103 जण गंभीर जखमी झाले होते. देशाच्या इतिहासातील या अत्यंत अत्यंत भयावह आगीच्या घटनेवर ही वेब सीरिज आधारित आहे.