Salman Khan | आता होणार ‘प्रेम की शादी’; सलमान खान याच्या खास मित्राचं मोठं वक्तव्य

| Updated on: Jul 10, 2023 | 12:12 PM

वयाच्या ५७ व्या वर्षी सलमान खान अडकणार विवाहबंधनात? 'प्रेम की शादी' म्हणत भाईजान याच्या खास मित्राने केलं मोठं वक्तव्य... नक्की काय आहे सत्य?

Salman Khan | आता होणार प्रेम की शादी; सलमान खान याच्या खास मित्राचं मोठं वक्तव्य
Follow us on

मुंबई | अभिनेता सलमान खान याला कायम विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ‘विवाहबंधनात कधी अडकणार?’ प्रत्येक मुलाखतीत आणि कोणत्याही कार्यक्रमात सलमान खान याला त्याच्या विवाहाबद्दल विचारण्यात येतं. सलमान खान याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं, पण कोणासोबतही अभिनेत्रीसोबत नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. वयाच्या ५७ व्या वर्षी देखील भाईजान सर्वकाही असून एकटा जगत आहे. सलमान खान खासगी आयुष्यात फेल ठरला असला तरी, प्रोफेशनल आयुष्यात मात्र अभिनेत्याला कोणही मागे टाकू शकत नाही. गेल्या काही वर्षापासून अभिनेत्याने अनेक नव्या कलाकारांना बॉलिवूडमध्ये एन्ट्री दिली, तर अनेक दिग्दर्शकांचं करियर योग्य मार्गावर आणण्यासाठी अभिनेत्याने पुढाकार घेतला.

पण इतरांसाठी घेतलेल्या पुढाकाराचा फटका मात्र सलमान खान याला बसला. महत्त्वाचं म्हणजे सलमान खान स्टारर ‘राधे’ आणि ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहात देखील पोहोचले नाहीत. सिनेमा विश्लेषकांनी देखील सिनेमावर टीका केली. यामुळे सलमान खान आता सावध झाला आहे.

सिनेमांना आलेल्या अपयशामुळे पुढच्या कारकिर्दीत कोणताही प्रयोग न करता सलमानला थेट विश्वासू दिग्दर्शक-मित्रांसोबत आता काम करताना दिसणार आहे. नुकताच भाईजान दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना भेटला आणि इन्शाअल्लाह सिनेमाचं शुटिंग सुरु करण्याची विनंती केली. आता सलमान खान याने खास मित्र आणि दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्यासोबत देखील हात मिळवणी केली आहे.

सूरज बडजात्या यांच्या ‘प्रेम की शादी’ सिनेमात सलमान खान मुख्य भूमिकेत झळकणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. राजश्री प्रॉडक्शनच्या सिनेमांनी सलमानला पडद्यावर प्रेम हे नाव दिलं आणि प्रेक्षकांना सलमान खान याने साकारलेली प्रेम ही भूमिका प्रचंड आवडली. ‘प्रेम की शादी’ सिनेमाला सलमान खान याने होकार दिला आहे. पण त्यामागे देखील एक मोठं कारण आहे.

गेल्या काही महिन्यांत जरा हटके जरा बचके आणि सत्यप्रेम की कथा या कौटुंबिक रोमँटिक सिनेमांना चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमांनी मोठी मजल मारली. याच कारणामुळे सलमान खान याने ‘प्रेम की शादी’ सिनेमाला होकार दिला आहे.

‘प्रेम की शादी’ सलमान खान आणि सूरज बडजात्या यांचा सिनेमा असणार आहे. याआधी दोघांनी एकत्र मैंने प्यार किया, हम आपके हैं कौन!, हम साथ-साथ हैं आणि प्रेम रतन धन पायो यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. आता चाहते सलमान खान याच्या ‘टायगर ३’ सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

‘टायगर ३’ सिनेमात अभिनेता इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमा चित्रपट 10 नोव्हेंबरला दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. टायगर सिनेमानंतर सलमान खान स्टारर ‘प्रेम की शादी’ सिनेमा २०२४ मध्ये प्रदर्शित करण्यासाठी तयारी सुरू आहे.