Chandrayaan 3 च्या लँडिंगनंतर राकेश रोशन जोरदार होऊ लागले ट्रेंड; कारण वाचून तुम्हीही पोट धरून हसाल!

| Updated on: Aug 24, 2023 | 8:21 AM

"मागच्या वेळी जेव्हा राकेश रोशन चंद्रावर पोहोचले, तेव्हा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना विचारलं होतं की तिथून भारत कसा दिसतोय?", असं त्या म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यावरून नेटकरी राकेश रोशन आणि हृतिक रोशन यांच्याबद्दलचे भन्नाट मीम्स शेअर करू लागले.

Chandrayaan 3 च्या लँडिंगनंतर राकेश रोशन जोरदार होऊ लागले ट्रेंड; कारण वाचून तुम्हीही पोट धरून हसाल!
Rakesh Roshan
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई | 24 ऑगस्ट 2023 : 14 जुलै रोजी पृथ्वीवरून झेपावलेल्या चांद्रयान 3 च्या ‘विक्रम’ लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केलं आणि भारताने नवा इतिहास घडवला. इस्रोने जाहीर केलेल्या वेळेवर संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांनी चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श करत असतानाचा सोहळा पाहणाऱ्या कोट्यवधी भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला. एकीकडे संपूर्ण देशभरात ही मोहीम फत्ते झाल्याचा आनंद साजरा होत असतानाच दुसरीकडे सोशल मीडियावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होऊ लागला. कारण चांद्रयान 3 मोहिमेच्या यशाबद्दल शुभेच्छा देताना ममता बॅनर्जी यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते राकेश रोशन यांचं नाव चुकून भारतीय अंतराळवीर म्हणून घेतलं. यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट मीम्स व्हायरल करण्यास सुरुवात केली.

राकेश शर्मा आणि राकेश रोशन या दोन नावांमध्ये त्यांचा गोंधळ झाला आणि चुकून त्यांनी राकेश रोशन यांचं नाव घेतलं. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. “मागच्या वेळी जेव्हा राकेश रोशन चंद्रावर पोहोचले, तेव्हा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना विचारलं होतं की तिथून भारत कसा दिसतोय?”, असं त्या म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यावरून नेटकरी राकेश रोशन आणि हृतिक रोशन यांच्याबद्दलचे भन्नाट मीम्स शेअर करू लागले.

हे सुद्धा वाचा

पहा मीम्स

दरम्यान चंद्रावर पोहोचण्याची किमया करणारा भारत हा चौथा देश असला तरी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा भारत हा पहिलाच देश ठरला. चार वर्षांपूर्वी याच महत्त्वाकांक्षेनिशी चंद्रावर झेपावलेले चांद्रयान 2 चंद्राच्या अगदी जवळ असताना कोसळलं होतं. त्या अपयशातून धडा घेत चांद्रयान 3 नव्या जिद्दीने, अधिक ताकदीने चंद्रावर पोहोचलं.