Rakhi Sawant Video : अभिनेत्री राखी सावंत कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून राखी बॉयफ्रेंड आदिल याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आली आहे. सुरुवातील सतत एकमेकांवर प्रेम व्यक्त करताना दिसत असलेल्या राखी आणि आदिल यांच्यातील वाद आता टोकाला पोहोचले आहेत. राखीने आदिल याच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे पोलिसांना आदिलला अटक केली आहे. ज्यामुळे आदिल याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान राखीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राखी दुबई याठिकाणी असलेल्या संपत्तीबद्दल बोलताना दिसत आहे.
राखीला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. तेव्हा राखी पापाराझींना म्हणाली, ‘दुबई याठिकाणी राखी सावंत हिची अकॅडमी सुरु झाली आहे. दुबईमध्ये मी आणखी एक घर देखील घेतलं आहे. एक नवी गाडी देखील घेतली आहे..’ त्यानंतर अचानक राखी भावुक देखील झाली.
राखी म्हणाली, ‘हिच ती जागा आहे, ज्याठिकाणी मी आदिलचं स्वागत केलं होतं. आज मला ही जागा आठवत आहे.’ सध्या राखीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राखी हिने आदिल याच्यावर फसवणूक, मारहाण आणि अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर विकले आहेत.. यांसारखे गंभीर आरोप लावले आहेत.
रिपोर्टनुसार, राखी सावंत हिची नेटवर्थ ३७ कोटी रुपये आहे. शिवाय मुंबईत राखीचं स्वतःचं घर देखील आहे. राखी रिऍलिटी शोच्या माध्यमातून कमाई करते. बिग बॉस तर कधी डान्स शोमध्ये राखी सावंत दिसते. याच शोच्या माध्यमातून राखी कमाई करते. सोशल मीडियावर कायम सक्रिय असणारी राखी प्रचंड रॉयल आयुष्य जगते.
सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या राखीकडे बॉलिवूडमध्ये कोणतंही काम नाही, तरी देखील ड्रामा क्विन कोट्यवधींची माया कमावतेय. काही दिवसांपू्र्वी राखी सावंत हिच्या आईचं निधन झालं होतं. आईच्या निधनानंतर राखीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना दुःखद बातमी कळवली.
राखी झगमगत्या विश्वात सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी राखी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या प्रत्येक व्हिडीओवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात.