बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर 14 एप्रिलला पहाटे गोळीबार करण्यात आला. ज्यावेळी हा गोळीबार झाला, त्यावेळी सलमान खान हा घरातच होता. या घटनेनंतर मोठी खळबळ बघायला मिळाली. पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला. दोन हल्लेखोर दुचाकीवर आले आणि त्यांनी हा गोळीबार केला. विशेष म्हणजे ही गोळीबाराची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्येच हल्लेखोरांना गुजरातच्या भुज येथील एका मंदिरातून ताब्यात घेतले. हे दोन्ही हल्लेखोर बिहारमधील असून ते गोळीबार करण्याच्या काही महिने अगोदरच मुंबईत दाखल झाले होते.
सलमान खान याच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर कलाकारांमध्येही भीतीचे वातावरण बघायला मिळाले. आता नुकताच या गोळीबाराच्या घटनेनंतर राखी सावंत हिने मोठे भाष्य केले आहे. हेच नाही तर थेट सलमान खान यालाच सल्ला देताना राखी सावंत ही दिसत आहे. आता राखी सावंत हिच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून दुबई येथे होती. नुकताच ती भारतामध्ये परतलीये. राखी सावंत हिने म्हटले की, सलमान भाई आता काहीही झाले तरीही तुम्ही बाल्कनीत अजिबात येऊ नका. कोणताही सण असो किंवा असून काहीही असो तुम्ही बाल्कनीत येऊ नका. हेच नाही तर भारताचा कोहिनुर सलमान खान असल्याचेही राखीने म्हटले.
या अगोदरची मेलकरून सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळी सलमान खानसाठी राखी सावंत मैदानात उतरल्याचे बघायला मिळाले. पुढे राखी सावंत म्हणाली, त्यावेळी मला ही गोळीबाराची घटना समजली, त्यावेळी मी खूप जास्त रडले. लोक षडयंत्र रचत असल्याचेही राखी सावंत हिने म्हटले.
सलमान खान याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळताना दिसत आहेत. पोलिसांनी सलमान खान याच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ केल्याचे देखील बघायला मिळत आहे. ज्यावेळी हा गोळीबार झाला, त्याच्या दोन दिवस अगोदरच ईदच्या दिवशी बाल्कनीत येऊन चाहत्यांना शुभेच्छा देताना सलमान खान दिसला होता, त्याचे बाल्कनीवर आता गोळीबार करण्यात आलाय.