Rakhi Sawant च्या आईचा शेवटचा व्हिडीओ समोर; निधनापूर्वी अशी होती प्रकृती

| Updated on: Jan 29, 2023 | 10:18 AM

राखीची आई जया भेडा गेल्या अनेक दिवसांपासून ब्रेन ट्यूमर आणि कर्करोगशी झुंज देत होत्या. पण राखीच्या आईची झुंज अपयशी ठरली आहे. शनिवारी राखीच्या आईने अखरेचा श्वास घेतला.

Rakhi Sawant च्या आईचा शेवटचा व्हिडीओ समोर; निधनापूर्वी अशी होती प्रकृती
Rakhi Sawant च्या आईचा शेवटचा व्हिडीओ समोर; निधनापूर्वी अशी होती प्रकृती
Follow us on

Rakhi Sawant Mother  : बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत (rakhi sawant) कायम सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांचं मनोरंजन करत असते. पण आता राखीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राखीची आई (rakhi sawant mother) जया भेडा गेल्या अनेक दिवसांपासून ब्रेन ट्यूमर आणि कर्करोगशी झुंज देत होत्या. पण राखीच्या आईची झुंज अपयशी ठरली. शनिवारी राखीच्या आईने अखरेचा श्वास घेतला. आईच्या निधनानंतर राखी पूर्णपणे कोलमडली आहे. आईच्या निधनानंतर राखी प्रचंड भावुक झाली आहे. राखी सतत आईच्या उपचारासाठी पैसे जमा करताना दिसत होती.

राखी आईसोबत शेवटच्या क्षणापर्यंत होती. आता राखीच्या आईचा निधनापूर्वीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये राखीची आई रुग्णालयातील बेडवर झोपलेल्या दिसत आहेत. त्यांच्या शेजारी रखी रडताना दिसत आहे. सध्या सर्वत्र राखीच्या आईच्या निधनाची चर्चा होत आहे. एवढंच नाही तर, अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राखीच्या आईला श्रद्धांजली वाहिली आहे.

 

 

महत्त्वाचं म्हणजे खुद्द राखीने आईचा शेवटचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत राखीने कॅप्शनमध्ये, ‘माझ्या आईचा हात आज माझ्या डोक्यावरुन हरवला आहे. आता माझ्यासाठी गमावण्यासारखं काहीही नाही. आय लव्ह यू आई… तुझ्या शिवाय आता काहीही नाही. आता माझी हाक कोण ऐकेल. मला मिठी कोण मारेल… आता मी काय करु…’ असं लिहिलं आहे. सध्या सर्वत्र राखीच्या व्हिडीओची चर्चा आहे.

राखीच्या आई जया भेडा गेल्या दोन वर्षांपासून ब्रेन ट्यूमर आणि कर्करोगशी गंभीर आजारांशी झुंजत होत्या. पण त्यांची झुंज अपयशी ठरली. अनेकदा जया भेडा रोखीसोबत कार्यक्रमांमध्ये दिसल्या. दोघींचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. पण गेल्या दोन वर्षांपासून जया भेडा सोशल मीडियापासून दूर होत्या. पण आता त्यांच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

राखी सावंत सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर राखीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. एवढंच नाही तर, राखी कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून राखा आदिल खान सोबत असलेल्या नात्यामुळे देखील चर्चेत आली आहे.