राखी सावंतला सायबर सेलचं समन्स, 27 तारखेला चौकशीला हजर राहण्याचे आदेश

| Updated on: Feb 21, 2025 | 12:30 PM

राखी सावंतच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, अभिनेत्रीला सायबर सेलचं समन्स, 27 तारखेला चौकशीला हजर राहण्याचे आदेश, काय आहे प्रकरण?

राखी सावंतला सायबर सेलचं समन्स, 27 तारखेला चौकशीला हजर राहण्याचे आदेश
Follow us on

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकत असते. आता देखील राखील समन्स पाठवण्यात आलं आहे. ‘इंडियाज गॉट लॅटेंट’ शो मधील वादग्रस्त विधान प्रकरणी राखी सावंतच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राखी सावंतला सायबर सेलने समन्स बाजावला आहे. अभिनेत्रीला 27 तारखेला चौकशीला हजर राहण्यासाठी सांगण्यात आलं आहे. 23 आणि 24 तारखेलाही काही कॉमेडियनची चौकशी होणार असल्याची माहिती मिळत आहे. ‘इंडियाज गॉट लॅटेंट’ प्रकरणात अनेकांची चौकशी होणार आहे.

काय आहे प्रकरण?

‘इंडियाज गॉट लॅटेंट’ शो मध्ये युट्यूबर रणवीर अलाहाबादिया याने आई – वडिलांवर वादग्रस्त वक्तव्य केलं. ज्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. सेलिब्रिटींपासून राजकीय नेत्याने देखील विरोध केला. याप्रकरणी पोलीस सध्या कसून चौकशी करत आहेत.

 

 

दरम्यान रणवीरच्या वादग्रस्त वक्तव्याची सर्वच स्तरातून विरोध होत असताना अभिनेत्री राखी हिने मात्र रणवीरचं समर्थन करताना दिसली. राखी म्हणाली, ‘त्याला माफ कर… काही हरकत नाही, असं होऊन जातं… काही वेळेस माफ करायला हवं… मला माहिती आहे, त्याने चुकीचं वक्तव्य केलं आहे. पण त्याला माफ करा…’ असं राखी म्हणाली होती.

इंडियाज गॉट लेटेंटबाबत सुरू असलेल्या वादात आरोपी रणवीर अलाहाबादिया, अपूर्वा मुखिजा आणि समय रैना हे महाराष्ट्र सायबरच्या संपर्कात आहेत. शुक्रवारी त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. तो महाराष्ट्र सायबर ऑफिसमध्ये जाऊन जबाब नोंदवणार आहे. अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या वेळेत रणवीर अलाहाबादिया, अपूर्वा मुखिजा आणि समय रैना यांचा जबाब नोंदवला जाणार आहे.