Rakhi Sawant | चक्क ‘या’ लूकमध्ये दिसली राखी सावंत, नेटकऱ्यांनी लावला क्लास, अभिनेत्रीने

| Updated on: Sep 02, 2023 | 4:25 PM

राखी सावंत आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून बघायला मिळत आहे. राखी सावंत ही सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. राखी सावंत हिच्यावर अनेक गंभीर आरोप तिचा पती आदिल दुर्रानी याने केले आहेत. ज्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का हा बसला.

Rakhi Sawant | चक्क या लूकमध्ये दिसली राखी सावंत, नेटकऱ्यांनी लावला क्लास, अभिनेत्रीने
Follow us on

मुंबई : राखी सावंत ही सध्या तूफान चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच राखी सावंत (Rakhi Sawant) ही आपल्या आयुष्यामधील पहिला उमराह करून भारतामध्ये दाखल झालीये. राखी सावंत हिचे विमानतळावर देखील जोरदार स्वागत करण्यात आले. आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्न (Marriage) केल्यानंतर राखी सावंत हिने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. इतकेच नाही तर लग्नानंतर राखी सावंत हिने आपले नाव फातिमा असल्याचे देखील जाहिर केले. राखी सावंत हिने मक्का येथून अनेक व्हिडीओ आणि फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहे.

राखी सावंत हिच्या खासगी आयुष्यामध्ये मोठे वादळ आल्याचे बघायला मिळत आहे. राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. ज्यानंतर आदिल याला जेलमध्ये जाण्याची वेळ आली. आता आदिल दुर्रानी हा जेलमधून बाहेर आलाय. यावेळी राखी सावंत हिची पोलखोल करताना आदिल दुर्रानी हा दिसला. आदिल याने राखी सावंत हिच्यावर गंभीर आरोप केले.

राखी सावंत हिच्यावर आदिल दुर्रानी हा ज्यावेळी आरोप करत होता. त्यावेळी राखी सावंत ही उमराह करण्यासाठी गेली. आता राखी सावंत ही उमराह करून भारतामध्ये दाखल झालीये. नुकताच एका कार्यक्रमामध्ये राखी सावंत ही अबाया घालून पोहचलीये. लाल रंगाचा अबाया हा राखी सावंत हिने घातल्याचे दिसत आहे.

या अबायासोबतच राखी सावंत हिने काही ज्वेलरी देखील घातल्याचे दिसत आहे. राखी सावंत हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. मात्र, राखी सावंत हिचा हा लूक नेटकऱ्यांना अजिबातच आवडल्याचे दिसत नाहीये. एकाने या व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, चार दिवस असे कपडे घालून फिरणार आहे ही राखी…

दुसऱ्याने लिहिले की, हिच्याकडे फार लक्ष देऊ नका, ही कधी काय करेल याचा अंदाजा नाही. तिसऱ्याने लिहिले की, बरे झाले हिने असे पूर्ण शरीर भरून कपडे तरी घातले. यावेळी पापाराझी यांना फोटोसाठी अनेक पोज देताना देखील राखी सावंत ही दिसली आहे. आता राखी सावंत हिचे या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.

उमराह करून ज्यावेळी राखी सावंत ही भारतामध्ये आली. त्यावेळी पापाराझी हे राखी सावंत हिला फोटो काढण्यासाठी राखी राखी आवाज देताना दिसले. यावेळी राखी सावंत हिने स्पष्ट केले की, माझे नाव आता फातिमा आहे फातिमा…राखी नका म्हणून. राखी सावंत हिच्याबद्दल आदिल दुर्रानी हा अजून काही मोठे खुलासे करण्याची दाट शक्यता आहे.