मुंबई : राखी सावंत ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. राखी सावंत (Rakhi Sawant) हिच्यावर तिचा पती आदिल दुर्रानी याने काही गंभीर आरोप केले. राखी सावंत हिने बिग बाॅस (Bigg Boss) मराठीमधून बाहेर पडत सर्वांनाच मोठा धक्का दिला. राखी सावंत हिने आदिल दुर्रानी नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केले. मात्र, आपल्या लग्नाची गोष्ट काही दिवस राखी हिने सर्वांपासून लपवून ठेवली. आदिल दुर्रानी याच्यावर राखी हिने देखील आरोप केले.
आदिल दुर्रानी आणि राखी सावंत यांच्यामधील वाद थेट पोलिस ठाण्यात जाऊन पोहचला. यानंतर थेट आदिल दुर्रानी याला काही महिने जेलमध्ये राहण्याची वेळ आली. आदिल दुर्रानी जेलमधून बाहेर आल्यावर त्याने राखी हिच्याबद्दल काही मोठे खुलासे केले. इतकेच नाही तर राखी सावंत आपल्या कुटुंबाला धमकावत असल्याचे त्याने म्हटले.
राखी सावंत हिचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये चक्क राखी सावंत ही मलायका अरोरा हिची खिल्ली उडवताना दिसली. हा व्हिडीओ पाहून सर्वचजण हैराण झाल्याचे बघायला मिळाले. इतकेच नाही तर मलायका अरोरा हिच्या चाहत्यांनी राखी सावंत हिला खडेबोल सुनावण्यास देखील सुरूवात केली.
सध्या राखी सावंत हिचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये राखी सावंत ही नवरात्रीनिमित्त देवीचे दर्शन घेण्यासाठी पोहचल्याचे दिसतंय. यावेळी तिथे प्रियांका चोप्रा हिची आई मधू चोप्रा देखील उपस्थित दिसत आहे. यावेळी मंडपामध्ये प्रियांका चोप्रा हिच्या आईच्या पाया पडताना राखी सावंत ही दिसत आहे.
हाच व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय. राखी सावंत हिच्या या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतर लोक तिची खिल्ली उडवताना दिसत आहेत. कारण या व्हिडीओमध्ये राखी सावंत ही देवीसमोरच प्रियांका चोप्रा हिच्या आईच्या पाया पडताना दिसतंय. लोकांनी थेट यावरूनच राखी सावंत हिची खिल्ली उडवलीये. एकाने लिहिले की, हाॅलिवूडमध्ये राखी काम मागत आहे.
दुसऱ्याने लिहिले की, प्रियांकाने आपल्याला हाॅलिवूड चित्रपटांमध्ये काम द्यावे यासाठीच राखीचे हे सर्व सुरू आहे. तिसऱ्याने लिहिले की, अरे देवासमोर हा काय नाटकीपणा आहे. जास्त करून लोकांना राखी सावंत हिचा हा व्हिडीओ अजिबातच आवडला नसल्याचे स्पष्ट दिसतंय. राखी सावंत हिच्या या व्हिडीओवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.