मुंबई : ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) ही दुबईवरून आल्यापासून सतत चर्चेत आहे. राखी सावंत ही काही दिवसांपूर्वी दुबईला गेली होती. राखी सावंत हिने दुबईमध्ये डान्स अॅकाडमीला सुरूवात केलीये. काही दिवसांपूर्वीच पापाराझी यांच्यासोबत बोलताना राखी सावंत ही म्हणाली होती की, माझे काम हे सध्या खूप जास्त वाढले आहे. यामुळे मला एका जीवनसाथीची खूप जास्त गरज आहे. मी एकटी काय काय करणार ना शेवटी? राखी सावंत ही काही दिवसांपूर्वी काहीही झाले तरीही आदिल दुर्रानी याला घटस्फोट (Divorce) देणार नसल्याचे सांगताना दिसली होती. मात्र, आता राखी सावंत हिचे सुर बदलले आहेत. राखी सावंत हिने स्पष्ट केले की, आदिल दुर्रानी याला घटस्फोट देणार आहे.
राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्न केल्याचे जाहिर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. मात्र, आदिल दुर्रानी याच्यावर काही दिवसांमध्ये अत्यंत गंभीर आरोप करताना राखी सावंत ही दिसली. इतकेच नाही तर यांचा वाद थेट कोर्टात जाऊन पोहचला. आदिल दुर्रानी हा सध्या जेलमध्ये आहे. आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हणताना देखील राखी बऱ्याच वेळा दिसली.
नुकताच आता राखी सावंत हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. राखी सावंत हिचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना मोठा धक्का बसलाय. या व्हिडीओमध्ये मोठा दावा करताना राखी सावंत ही दिसत आहे. या व्हिडीओमध्ये राखी सावंत ही चक्क रिक्षामध्ये दिसत आहे. यावेळी पापाराझी हे राखीला रिक्षामध्ये फिरण्याचे कारण विचारताना दिसत आहेत.
राखी सावंत म्हणते की, माझ्या आयुष्याला ग्रहण लागले आहे. बघा आता माझ्यावर रिक्षाने फिरण्याची वेळ चक्क आलीये. माझा ड्रायव्हर गाडीची चावी घेऊन पळून गेलाय. इतकेच नाही तर त्याने माझा गोल्डचा मोबाईल आणि काही पैसे देखील चोरी केले आहेत. गरीब आहे म्हणून त्याला मी कामावर ठेवले होते. पण त्याने माझ्यासोबत असे केले.
पप्पू यादव माझ्या आयुष्यात ग्रहण लावून गेल्याचे म्हणताना देखील राखी सावंत ही दिसत आहे. पप्पू यादव हे राखी सावंत हिच्या ड्रायव्हरचे नाव आहे. तो मुळ उत्तर प्रदेशमधील आहे. ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पप्पू यादव याच्याविरोधात तक्रार देणार असल्याचे देखील राखी सावंत हिच्याकडून सांगण्यात आले आहे. आता राखी सावंत हिचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय.