मुंबई : परफेक्ट फिगरसाठी अनेक कलाकार स्ट्रिक्ट रुटीन फॉलो करतात. बॉलिवूड अभिनेत्री रकुलप्रीत सिंहसुद्धा या बाबतीत मागे नाही. ती अनेक वेळा तिच्या वर्कआऊटचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतंच तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती सायकल चालवताना दिसतीये. रकुलप्रीतनं फिटनेस सोबतच टाईम मॅनेजमेंटसाठी सायकल चालविली आहे. तिच्याकडून प्रेरणा घेऊन तुम्हीही स्वत: ला फिट ठेवू शकता.
सायकलिंगचे फायदे
फिटनेसच्या बाबतीत सायकलिंगचे अनेक फायदे आहेत. सायकलिंगमध्ये तुमच्या संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. पायांचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते, वजन कमी होतं आणि महत्त्वाचं म्हणजे रोग प्रतिकारशक्ती वाढते . सायकलिंग कर्करोग आणि हृदयरोगांपासून देखील संरक्षण करते. सायकल चालवल्यानं शरीरात रक्त आणि ऑक्सिजनचा प्रवाह व्यवस्थित होतो, ज्यामुळे मन प्रसन्न राहतं आणि नैराश्यासारख्या समस्या उद्भवत नाहीत.
सायकलिंगमुळे आयुष्य वाढतं
काही संशोधनात असंही समोर आलंय की दैनंदिन जीवनात सायकल चालवल्यानं आयुष्य वाढतं. याच कारणामुळे मोठ्या शहरांमधील काही लोक आठवड्यातून एक किंवा दोन दिवस सायकलचा वापर करत ऑफिसमध्ये जाऊ लागले आहेत. जर तुम्ही दररोज व्यायाम करू शकत नसाल तर सायकल चालवा. त्यामुळे तुमचं शरीर तंदुरुस्त राहिल.
रकुलनं यापूर्वीही लोकांना प्रेरणा दिली
रकुलप्रीतनं यापूर्वी देखिल अनेक वेळा लोकांना फिटनेसबद्दल जागृत केलं आहे. लॉकडाऊन दरम्यानही ती तिच्या इंस्टा वॉलवर अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर करत होती ज्यामध्ये ती जिम वर्कआउट्स, योगा, रनिंग आणि कधी कधी गोल्फ खेळताना दिसली. एवढंच नाही तर यापूर्वी तिनं 30 किमी सायकलिंगसुद्धा पूर्ण केलंय. तर या वेळी तिनं 12 किमी सायकल चालविली आहे. ‘टाईम मॅनेजमेंटसाठी मी सायकल चालवत आहे. #12 किमी’ असं कॅप्शन देत तिनं हा व्हिडीओ शेअर केला आहे.
संबंधित बातम्या
Fitness Tips | ना व्यायाम, ना डाएट तरीही राहता येईल तंदुरुस्त! जाणून घ्या ‘हे’ फंडे…
Skin Care | चमकदार त्वचा हवीय? घरच्या घरी ट्राय करा ‘वॉलनट स्क्रब’!