मुंबई | 8 मार्च 2024 : आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी भविष्यात आई होण्यासाठी स्वतःचे एग्स फ्रीज केले आहेत. दाक्षिणात्या अभिनेता राम चरण याची पत्नी उपासना हिने देखील स्वतःचे एग्स फ्रीज करुन ठेवले होते. सांगायचं झालं तर, उपासना कामिनेनी कोनिडेला हिची ओळख फक्त राम चरण याची पत्नी नाहीतर, प्रसिद्ध उद्योजक म्हणून देखील आहे. उपासना मॉर्डन विश्वातील आत्मविश्वासू उद्योजिका आहे. शिवाय तिच्या स्पष्ट वक्तव्यामुळे देखील ती कायम चर्चेत असते. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत उपासना हिने स्टारडम आणि स्वतःबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या…
उपासना म्हणाली, ‘एक आई असल्यामुळे प्रॉडक्टिव्ह काम करणं माझ्यासाठी आव्हानात्मक आहे. पण मी माझं बेस्ट देत आहे आणि मला माहिती आहे मला काय करायचं आहे. मी मॅटरनिटी लीव्हवर असताना देखील अनेक कंपन्यांसोबत काम करत आहे. याठिकाणी मला महिलांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे स्वतःचे एग्स फ्रीज करुन ठेवा.’
‘जर तुम्ही एग्स फ्रीज केले असतील तर तुम्ही कधीही मातृत्वाचा अनुभव घेऊ शकता. मला असं वाटतं जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचता तेव्हाच आई होण्यााचा निर्णय घ्यायला हवा… जर तुम्ही करियरला दुसरं स्थान दिल्यानंतर बाळाला जन्म देण्याचा विचार करत असाल तर, तुम्हाला कायम पॉकेट मनीच्या आधारावर जगावं लागेल…’
पुढे अभिनेत्याची पत्नी म्हणाली, ‘मी माझे एग्ज फ्रीज केले होते. आज मी गर्वाने सांगेल मला आणि रामला खूप चांगलं वाटत आहे. कारण आम्हाला वाटलं तेव्हा आम्ही बाळाला जन्म देण्याचा विचार केला.’ सांगायचं झालं तर, गेल्या वर्षी राम चरण आणि उपासना यांच्या घरात चिमुकलीचं स्वागत झालं. त्यांच्या मुलीचं नाव कलिन कारा कोनिजेला असं आहे.
मुलीचा जन्म झाल्यानंतर अभिनेत्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत आनंद व्यक्त केला. सोशल मीडियावर अभिनेत्याची पोस्ट तुफान व्हायरल झाली. राम चरण फक्त अभिनेता नाहीतर, उद्योजक देखील आहे. राम चरण कुटुंबासोबत रॉयल आयुष्य जगतो..
राम चरण याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेता सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतो. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेता कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.