राम कपूर याचा या अभिनेत्रीसोबत १७ मिनिटं तो रोमँटीक सीन, पण सनी लिओनीसोबत मात्र जेव्हा….

| Updated on: Jul 29, 2023 | 8:27 PM

राम कपूर याचा अभिनेत्रीसोबत १७ मिनिटं रोमँटिक सीन चालला, पण जेव्हा सनी लिओनी हिच्यासोबत रोमान्सची वेळ आली, तेव्हा...

राम कपूर याचा या अभिनेत्रीसोबत १७ मिनिटं तो रोमँटीक सीन, पण सनी लिओनीसोबत मात्र जेव्हा....
Follow us on

मुंबई | 29 जुलै 2023 : सिनेमांमध्ये कायम किसिंग सीन, इंटिमेट सीन शूट केले जातात. काही इंटिमेट सीनमुळे सिनेमे आणि कलाकार वादाच्या भोवऱ्यात देखील अडकतात. पण एक काळ असा होता जेव्हा छोट्या पडद्यावर तब्बल १७ मिनिटं इंटिमेट सीन दाखवण्यात आला. तेव्हा ‘ती’ मालिका देखील तुफान चर्चेत रंगली. सध्या ज्या मालिकेची चर्चा रंगत आहे, त्या मालिकेचं नाव आहे, ‘बडे अच्छे लगते है…’ मालिकेने प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. मालिकेत अभिनेता राम कपूर आणि अभिनेत्री साक्षी तन्वर यांनी मुख्य भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. एवढंच नाही तर, मालिकेमुळे राम कपूर यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आणि मालिका अभिनेत्याच्या करियरमधील महत्त्वाची गोष्ट ठरली.

‘बडे अच्छे लगते हैं’ एक अशी मालिका आहे, जिने स्वतःच्या काळात प्रेक्षकांना वेड लावलं. मालिकांमध्ये निषिद्ध समजल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी या मालिकेने छोट्या पडद्यावर आणल्या. मालिकेतील राम कपूर आणि साक्षी तन्वर यांची केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना आवडत होती.

पण टीव्ही क्विन एकता कपूर हिने मालिकेत असा सीन दाखवला ज्यामुळे मालिका तुफान चर्चेत तर आली, पण वादाच्या भोवऱ्यात देखील अडकली. राम कपूर आणि साक्षी तन्वर यांच्यात चित्रित केलेल्या लव्ह मेकिंग सीनची खूप चर्चा झाली होती. छोट्या पडद्यावर पहिल्यांदाच असा सीन शूट करण्यात आला होता. तब्बल १७ मिनिटं राम – साक्षी यांच्यातील खास क्षण छोट्या पडद्यावर दाखवण्यात आले.

हे सुद्धा वाचा

टीव्ही विश्वातील साध्या दिसणाऱ्या कलाकारांनी ऑनस्क्रिन लव्ह मेकिंग सीन दिले आणि चर्चेत आले. ‘अभय २’, ‘बहुत हुआ सम्मान’ सिनेमात देखील राम कपूर यांनी भन्नाट भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. ‘प्रत्येक कलाकाराला स्वतःला वेग-वेगळ्या भूमिकेत पाहायला आवडतं. पण टीव्ही प्रेक्षकांची आवड वेगळी असते. एकदा का त्यांना तुमची एखादी भूमिका आवडली की त्यांना इतर कोणत्याही भूमिकेत तुम्हाला पाहणं अवघड असतं..’ असं खुद्द राम कपूर म्हणाले होते.

राम कपूर यांनी स्वतःला छोट्या पडद्यापर्यंत मर्यादित ठेवलं नाही तर, सिनेमांमध्ये देखील त्यांनी हिरो म्हणून चाहत्यांचं मनोरंजन केलं. ‘कुछ कुछ लोचा है’ सिनेमात त्यांनी अभिनेत्री सनी लोओनी हिच्यासोबत देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती. सिनेमाचं दिग्दर्शन देवांग ढोलकिया यांनी केलं होतं.

सनी लिओनी – राम कपूर स्टारर . ‘कुछ कुछ लोचा है’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरला, पण सनी हिच्यासोबत स्क्रिन शेअर केल्यामुळे राम कपूर तुफान चर्चेत आले. सिनेमात राम कपूर यांनी प्रवीण पटेल भूमिकेला न्याय दिला होता.

राम कपूर यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं. ज्यामुळे चाहत्यांनी देखील राम कपूर यांना डोक्यावर घेतलं. ‘मान्सून वेडिंग’, ‘हजारो ख्वाहिशे ऐसी’, ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘उडान’, ‘एक मैं और एक तू’, ‘एजेन्ट विनोद’, ‘स्टूडेन्ट ऑफ द ईयर’, ‘मेरे डैड की मारुती’, ‘शादी के साइड इफेक्ट्स’, ‘बार बार देखो’ आणि ‘हमशकल्स’ सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत राम कपूर यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं.