Ayodhya Ram Mandir : अयोध्या याठिकाणी प्रभू राम यांची राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा होणार आहे. या दिवसासाठी अयोध्यानगरी सजून तयार झाली आहे. तो ऐतिहासिक क्षण जवळ येतोय, ज्याची बऱ्याच वर्षांपासून प्रतिक्षा होती. देश राममय झाला आहे. 22 जानेवारीचा दिवस उत्सवासारखा साजरा करण्याची तयारी आहे. 22 जानेवारी या दिवसाचा साक्षीदार होण्यासाठी अनेक सेलिब्रिटी देखील अयोध्या याठिकाणी पोहोचणार आहेत. संपूर्ण देशात सर्वत्र फक्त आणि फक्त 22 जानेवारी या दिवसाची प्रतीक्षा आणि चर्चा रंगली आहे. सांगायचं झालं तर, ‘रामायण’ मालिकेतील राम – सीता, लक्ष्मण अयोध्या याठिकाणी पोहोचले आहेत. अयोध्या नगरीत त्यांचं मोठ्या थाटात स्वागत देखील करण्यात आलं.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे 22 जानेवारीला ‘रामायण’ मालिकेतील राम – सीता, लक्ष्मण प्रेक्षकांना खास भेट देणार आहेत. नुकताच, अभिनेते अरुण गोविल यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, लवकरच ‘हमारा राम आये हैं’ हे गाणं प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. अरुण गोविल यांनी नव्या गाण्याची घोषणा केल्यानंतर चाहते देखील गाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
Let’s welcome our beloved Lord Ram, Sita and Lakshman in Ayodhya in the mesmerising voice of Sonu Nigam in “Humare Ram Aaye Hai” a symphony penned and composed by Abhishek Thakur featuring original Ram Arun Govil , original Sita Dipika Chikalia and original Laxman Sunil Lehri.… pic.twitter.com/ip5CtNFq2P
— Arun Govil (@arungovil12) January 18, 2024
अरुण गोविल ट्विट करत म्हणाले, ‘चला प्रभू राम – सीता आणि लक्ष्मण यांचं अयोध्यामध्ये स्वागत करु. सोनू निगम यांच्या आवाजातील गाणं ‘हमारे राम आए हैं’ प्रदर्शित होणार आहे… हे गाणं 22 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे..’ गाण्यात अरुण गोविल, सुनील लहरी आणि दीपिका चिखलिया दिसणार आहेत… सध्या सर्वत्र नव्या गाण्याची चर्चा रंगली आहे.
अरुण गोविल, सुनील लहरी आणि दीपिका चिखलिया हे राम नगरीत पोहोचले आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील झाला. सोशल मीडियावर राम मंदीर आणि अयोध्या नगरीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. चाहते देखील व्हिडीओ लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. महानायक अमिताभ बच्चन, अजय देवगण, अक्षय कुमार, आलिया भट्ट, रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, विराट कोहली यांच्यासह अनेक सेलिब्रिटी या दिवसाचे साक्षीदार होणार आहेत. या यादीत रजनीकांत, केजीएफ स्टार यश, धनुष, प्रभास, राम चरण यांसारख्या मोठ्या नावांचा देखील समावेश आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात 4000 साधू-संतांसह देशातील सुमारे 7000 पाहुण्यांनाही सोहळ्यासाठी आमंत्रण मिळालं आहे.