राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याविषयी अनुराग कश्यपचं वादग्रस्त वक्तव्य

| Updated on: Mar 08, 2024 | 2:49 PM

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याविषयी निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपने वादग्रस्त वक्तव्य केलंय. कोलकाता इथल्या एका कार्यक्रमात त्याला राम मंदिराविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्याने आपलं परखड मत मांडलं.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याविषयी अनुराग कश्यपचं वादग्रस्त वक्तव्य
राम मंदिराविषयी काय म्हणाला अनुराग कश्यप?
Image Credit source: Instagram
Follow us on

कोलकाता : 8 मार्च 2024 | निर्माते-दिग्दर्शक अनुराग कश्यपने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाबाबत परखड मत व्यक्त केलं. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा म्हणजे येत्या काळात आणि सध्या देशात काय घडतंय, त्याची जाहिरातबाजी होती, असं त्याने म्हटलंय. कोलकातामधील एका कार्यक्रमात अनुरागला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होतं. त्यावर बोलताना तो म्हणाला, “22 जानेवारी रोजी जे घडलं, ती सगळी जाहिरातबाजी होती. त्या घटनेकडे मी याच दृष्टीकोनातून पाहतो. बातम्यांदरम्यान ज्याप्रकारे जाहिराती चालतात, तशी ही 24 तास चालणारी जाहिरात होती. माझं नास्तिक असण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे माझा जन्म वाराणसीत झाला.”

म्हणून मी नास्तिक..

“माझा जन्म धर्माच्या नगरीत झाला, त्यामुळे धर्माचा बाजार मी खूप जवळून पाहिला आहे. तुम्ही त्याला राम मंदिर म्हणू शकता, पण ते कधीच राम मंदिर नव्हतं. ते रामलल्लाचं मंदिर होतं आणि संपूर्ण देश या दोघांमधील फरक सांगू शकत नाही. एकाने असं म्हटलं होतं की, धर्म हा दुष्टांचा अंतिम आधार आहे. जेव्हा तुमच्याकडे देण्यासाठी काहीच उरत नाही, तेव्हा तुम्ही धर्माकडे वळता. मी नेहमीच स्वत:ला नास्तिक म्हटलंय. कारण मी पाहिलंय की मोठे झाल्यानंतर निराश झालेले लोक मोक्षाची मागणी करण्यासाठी मंदिरात जायचे. जणू काही एखादं बटण दाबलं की सर्वकाही समस्या मिटू शकतात,” असं तो पुढे म्हणाला.

आपण आदर्शवादी मूर्ख

आपली परखड मतं मांडताना तो पुढे म्हणाला, “आपण ज्याप्रकारे लढतो, त्याची पद्धत बदलण्याची गरज आहे. तुमची माहिती अल्गोरिदमद्वारे नियंत्रित केली जातेय. त्यामुळे तुम्हाला जे ऐकायचं असतं तेच तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. जे लोक या सर्व गोष्टी नियंत्रित करत आहेत, ते इतरांपेक्षा चार पाऊलं पुढे आहेत. त्यांचं तंत्रज्ञान खूप प्रगत आहे, ते स्मार्ट आहेत, त्यांच्याच समज आहे. आपण मात्र अजूनही भावूक आणि आदर्शवादी मूर्ख आहोत.”

हे सुद्धा वाचा

पोस्टर फाडण्यात आपली ऊर्जा आणि वेळ वाया

खऱ्या प्रश्नांकडे लक्ष केंद्रीत करण्याऐवजी लोक पोस्टर फाडण्यातच आपली ऊर्जा आणि वेळ घालवत असल्याचंही अनुरागने या मुलाखतीत म्हटलंय. “तुमची ऊर्जा पोस्टरांना फाडण्यातच वाया जातेय. जे काम करायचंय, ते करण्याच्या त्यांच्याकडे अनेक पद्धती आहेत. आपण बौद्धिक वाद सुरू करून आपला वेळ वाया घालवतोय. मी अशा लोकांना सरळ म्हणतो की तुम्ही बरोबर आहात आणि माझं काम करू लागतो. आपली सर्व ऊर्जा अशा निरर्थक भांडणांमध्ये जातेय. ते अशाचप्रकारे आपल्याला व्यस्त ठेवतात. आपल्याला वाटतं की आपण लढतोय, पण खऱ्या अर्थाने आपण काहीच करत नसतो. आपल्याला त्यांच्या जाळ्यात अडकवलं गेलंय”, असं मत अनुरागने मांडलं.