अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच तिच्या अतरंगी फॅशनमुळे चर्चेत असते. तोकड्या कपड्यांमुळे उर्फीवर प्रचंड टीकाही होते. मात्र बोल्डनेसच्या बाबतीत साक्षी चोप्राने तिला टक्कर दिली आहे.
रामायणसारख्या लोकप्रिय मालिकेचे निर्माते रामानंद सागर यांची साक्षी ही नात आहे. ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असून तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.
कधी बिकिनी तर कधी त्याहून रिव्हिलिंग ड्रेस परिधान करून साक्षीने हे फोटोशूट केले आहेत. या फोटोंमुळे आता साक्षीसुद्धा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
साक्षीचे हे फोटो पाहून नेटकरी तिची तुलना उर्फी जावेदशी करत आहेत. तर साक्षी उर्फीची प्रतिस्पर्धी असल्याचंही काहीजण म्हणत आहेत.
साक्षीचे इन्स्टाग्रामवर पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या फोटोंवर अनेकांनी टीकासुद्धा केली आहे. साक्षी ही गायिका आहे आणि त्याचसोबत ती मॉडेलिंगसुद्धा करते. साक्षी भारतात नाही तर कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजिलिसमध्ये राहते. तिने तिथेच फिल्ममेकिंगचं शिक्षण घेतलं आहे.