मुंबई | 12 मार्च 2024 : अभिनेते विंदू दारा सिंग यांनी ‘आदिपुरुष’ सिनेमाला ओम राऊत यांची सर्वात मोठी चुकी असल्याचं म्हणाले होते. ‘आदिपुरुष’ सिनेमामुळे देशात वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. आता ‘रामायण’ मालिकेत श्रीरामांची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांनी नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ सिनेमा आणि सिनेमातील कलाकारांवर मोठं वक्तव्य केलं आहे. सांगायचं झालं तर, सिनेमात अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
‘रामायण’ सिनेमात रणबीर श्रीरामांची भूमिका साकारणार असल्यामुळे अभिनेता भूमिका योग्य न्याय देऊ शकतो की नाही? असा प्रश्न अरुण गोविल यांना विचारण्याच आला. यावर अरुण गोविल म्हणाले, ‘रणबीर एक संस्कारी मुलगा आहे. पण तो सिनेमाला न्याय देऊ शकतो की नाही? हे येणाऱ्या वेळेत स्पष्ट होईल…’
‘रणबीर भूमिका योग्य न्याय देऊ शकतो की नाही? ही गोष्ट फक्त वेळ सांगू शकते. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी काहीही बोलू शकत नाही. पण जिथपर्यंत रणबीरचा प्रश्न आहे. तो एक उत्तम अभिनेता आहे. अवॉर्ड विनिंग अभिनेता आहे…’
‘मला माहिती आहे रणबीर एक संस्कारी मुलगा आहे. त्याच्यामध्ये नैतिकता, संस्कार आणि संस्कृती आहे… मी रणबीरला अनेकदा पाहिलं आहे. मला माहिती आहे, रणबीर सिनेमाला योग्य न्याय देईल आणि भूमिका योग्यप्रकारे करण्याचा प्रयत्न करेल…’ असं देखील अरुण गोविल, रणबीर याच्याबद्दल म्हणाले आहेत.
नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ सिनेमात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री साई पल्लवी माता सीता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात सनी देओल, लारा दत्ता, विजय सेतुपती देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
रणबीर कपूर याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. नुकताच अभिनेता Animal सिनेमामुळे चर्चेत आला होता. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई देखील केली. आता प्रेक्षक अभिनेत्याच्या ‘रामायण’ सिनेमाला किती प्रेम देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अरुण गोविल यांनी ‘रामायण’द्वारे स्वतःची वेगळी ओळख आणि लोकप्रियता मिळवली आहे.. आजपर्यंत कोणीही त्यांच्याशी स्पर्धा करू शकले नाही. अनेकांनी सिनेमे आणि टीव्ही शो केले, पण आजही लोकांना श्रीरामांच्या भूमिकेसाठी अरुण गोविल यांचं नाव आणि चेहरा सर्वात आधी आठवतो.