मुंबई : बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. रणबीर कपूर याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. रणबीर कपूर हा त्याच्या आगामी अॅनिमेशन चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसतोय. आज रणबीर कपूर याची लेक राहा एक वर्षांची झालीये. सध्या सोशल मीडियावर रणबीर कपूर याचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये रणबीर कपूर हा धमाल करताना दिसत आहे.
रणबीर कपूर हा थेट अरिजीत सिंह याच्या कॉन्सर्टमध्ये पोहचलाय. विशेष म्हणजे यावेळी धमाल आणि मस्ती करताना रणबीर कपूर हा दिसतोय. कॉन्सर्टमध्ये रणबीर कपूर हा थेट चन्ना मेरेया या गाण्यावर जबरदस्त असा डान्स करताना दिसतोय. विशेष म्हणजे चन्ना मेरेया या गाण्यावरील रणबीर कपूर याचा डान्स चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे बघायला मिळाले.
चन्ना मेरेया या गाण्यावर रणबीर कपूर हा डान्स करत असताना उपस्थित प्रेक्षक धमाल करत आहेत. विशेष म्हणजे रणबीर कपूर हा मुंबईपासून दूर चंदीगडमध्ये पोहचलाय. आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूर याला थेट ईडीने नोटीस पाठवली. महादेव गेमिंग अॅप प्रकरणात रणबीर कपूर याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झालीये.
Channa Mereya is literally made for Ranbir Kapoor 😍#RanbirKapoor #ArijitSingh #Satranga #Animal #AnimalTheFilm pic.twitter.com/p8SSYJ3fiI
— 𝙑amsi ♪ (@RKs_Tilllast) November 4, 2023
महादेव गेमिंग अॅप प्रकरणात रणबीर कपूर याच्यावर अत्यंत गंभीर आरोप हे करण्यात आले आहेत. या अॅपचे प्रमोशन करण्यासाठी रणबीर कपूर याने तगडी रक्कम घेतल्याचे देखील सांगितले जात आहे. रणबीर कपूर याचा काही दिवसांपूर्वीच तू झूठी मैं मक्कार हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील रणबीर कपूर हा दिसला.
तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाला म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही. शेवटी हा चित्रपट फ्लाॅप गेला. रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर हे पहिल्यांदाच चित्रपटामध्ये स्क्रीन शेअर करताना दिसले. यामुळेच या जोडीकडून मोठ्या अपेक्षा या नक्कीच होत्या. मात्र, प्रत्यक्षात या जोडीला धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही.