मुंबई : बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे रणबीर कपूर याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीज रणबीर कपूर याचा अॅनिमल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. अॅनिमल या चित्रपटात रणबीर कपूर याच्यासोबत रश्मिका मंदाना ही मुख्य भूमिकेत दिसली. रणबीर कपूर आणि रश्मिकाचा हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसला. या चित्रपटाने तूफान अशी कमाई नक्कीच केलीये. रणबीर कपूर याची फॅन फाॅलोइंग सोशल मीडियावर बघायला मिळते.
रणबीर कपूर याचा ‘ऐ दिल है मुश्किल’ हा चित्रपट तूफान चर्चेत होता. या चित्रपटात रणबीर कपूर अनुष्का हिच्यासोबत रोमान्स करताना दिसला. या चित्रपटाचे प्रमोशन करत असताना रणबीर कपूर याला मोठा प्रश्न विचारण्यात आला. यावेळीचे रणबीर कपूर याचे उत्तर ऐकून लोक हे चांगलेच हैराण होताना दिसली. रणबीर कपूर हा ऐश्वर्या राय आणि अनुष्का शर्मा यांच्याबद्दल थेट बोलताना दिसला.
रणबीर कपूर याला विचारण्यात आले की, अनुष्का शर्मा आणि ऐश्वर्या राय यांच्यापैकी कोण चांगला किसर आहे? यावेळी रणबीर कपूर याने सर्वांनाच हैराण करणारे असे उत्तर दिले. रणबीर कपूर की, मी कधी ऐश्वर्या राय हिला किस केले नाहीये…पण मला अनुष्का शर्मा ही चांगली किसर वाटते. त्याला अनुष्का शर्मा हिला किस करायला आवडेल असेही त्याने म्हटले होते.
आता सध्या रणबीर कपूर याची ही मुलाखत चांगलीच चर्चेत आलीये. अनुष्का शर्मा ही तशी बऱ्याच वर्षांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. हेच नाही तर 2019 मध्ये अनुष्का शर्मा हिचा झिरो हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाला काहीच धमाका करता नाही आला. तेंव्हापासून मोठ्या पडद्यापासून अनुष्का शर्मा ही दूरच आहे.
अनुष्का शर्मा ही सध्या मुलगी वामिका हिला वेळ देताना दिसत आहे. बऱ्याच वेळा अनुष्का ही क्रिकेट मॅच बघण्यासाठी स्टेडियमवर देखील पोहचते. चित्रपटांपासून जरी सध्या अनुष्का ही दूर असली तरीही ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. अनुष्का शर्मा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.