Ranbir Kapoor | रणबीर कपूर याने गर्लफ्रेंडबद्दल केले मोठे भाष्य, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, म्हणाला’ गर्लफ्रेंड सोडणे…

| Updated on: Jul 10, 2023 | 2:25 PM

बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूर याचा तू झुठी में मक्कार हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, म्हणावा तसा प्रतिसाद हा रणबीर कपूर याच्या चित्रपटाला मिळाला नाही. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना रणबीर कपूर हा दिसला होता.

Ranbir Kapoor | रणबीर कपूर याने गर्लफ्रेंडबद्दल केले मोठे भाष्य, तो व्हिडीओ व्हायरल, म्हणाला गर्लफ्रेंड सोडणे...
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट यांचे लग्न 14 एप्रिल 2022 रोजी झाले. विशेष म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी एकमेकांना बरीच वर्षे डेट केल्यानंतर लग्न केले. आलिया भट्ट हिने 6 नोव्हेंबर 2022 रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी त्यांच्या मुलीचे नाव राहा असे ठेवले आहे. काही दिवसांपूर्वीच आलिया भट्ट ही मुलीला घेऊन करीना कपूर हिच्या घरी गेली होती. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी त्यांच्या मुलीची एकही झलक अजून चाहत्यांना दाखवली नाहीये. सोशल मीडियावर (Social media) एक पोस्ट शेअर करत आलिया हिने मुलीच्या नावाचा अर्थ सांगितला होता.

रणबीर कपूर याने आलिया भट्ट हिच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर बाॅलिवूडच्या टाॅप अभिनेत्रींना डेट केले आहे. दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर हे काही वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. दीपिका पादुकोण हिच्यानंतर रणबीर कपूर याने कतरिना कैफ हिला देखील डेट केले आहे. असे सांगितले जाते की, रणबीर कपूर यानेच दीपिकाला सोडले होते.

रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांचे ब्रेकअप झाल्यानंतर त्यांनी ये जवानी है दीवानी या चित्रपटामध्येसोबत काम केले आहे. रणबीर कपूर याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर दीपिका पादुकोण चक्क डिप्रेशनमध्ये गेल्याचे सांगितले जाते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ दीपिका आणि रणबीर कपूर यांचा आहे.

ये जवानी है दीवानी चित्रपटाचे प्रमोशन करत असताना एका चाहत्याने रणबीर कपूर याला विचारले होते की, दिल्लीवाल्या गर्लफ्रेंडसाठी तू सध्याच्या गर्लफ्रेंडला सोडणार का? यावर रणबीर कपूर हा म्हणतो की, मुळात म्हणजे माझी कोणती गर्लफ्रेंड दिल्लीची नाहीये. हा पण एखाद्या दुसऱ्या मुलीसाठी आपल्या गर्लफ्रेंडला सोडणे हे नक्कीच चुकीचे आहे.

सर्वकाही गोष्टी या परिस्थितीवर आधारित असल्याचे म्हणताना देखील रणबीर कपूर हा दिसत आहे. ज्यावेळी रणबीर कपूर हे सर्वकाही बोलत आहे त्यावेळी दीपिका पादुकोण हिच्या चेहऱ्यावरील हावभाव काहीतरी वेगळेच दिसत आहेत. हा जुन्या व्हिडीओ आहे. मात्र तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकजण या व्हिडीओवर कमेंट करत रणबीर कपूर याचे दाखवण्याचे हात आणि खाण्याचे दात वेगळे असल्याचे म्हणत आहेत. मोठ्या प्रमाणात यावर कमेंट केल्या जात आहेत.