मुंबई | 29 जानेवारी 2024 : अभिनेता रणबीर कपूर याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. ‘ॲनिमल’ सिनेमात दमदार भूमिका साकारल्यानंतर रणबीर याच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली आहे. रणबीर फक्त त्याच्या खासगी आयुष्यामुळे नाही प्रोफेशनल आयुष्यामुळे देखील चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. एवढंच नाही तर, त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. आता देखील अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रणबीर याने गार्डला दिलेली वागणूक चाहत्यांना फार आवडली आहे. त्यामुळे सर्वत्र रणबीर याचं कौतुक होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रणबीर बाहेर जाताना दिसत आहे. अभिनेता कारमधून उतरल्यानंतर त्याचे फोटो काढण्यासाठी पापाराझींनी गर्दी केली.
पापाराझी अभिनेत्याचे फोटो क्लिक करत असताना, एक गार्ड त्याठिकाणी उभे होते. तेव्हा पापाराझींनी गार्डला बाजूला होण्यास सांगितलं. तेव्हा रणबीर याने गार्डला जवळ घेत पापाराझींना पोज दिल्या. सध्या रणबीर कपूर याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. एक नेटकरी व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, ‘रणबीर प्रचंड क्यूट आणि स्वीट आहे..’ तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘काका प्रचंड लकी आहेत..’ तर अनेक नेटकऱ्यांनी रणबीर कपूर याच्या स्वभावाचं कौतुक केलं आहे.
रणबीर कपूर याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ‘ॲनिमल’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी केली. आता अभिनेता ‘रामायण’ सिनेमामुळे चर्चेत आहे. चाहते देखील ‘रामायण’ सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रणबीर सिनेमात प्रभू राम यांच्या भूमिकेत दिसेल.
खासगी आयुष्यामुळे देखील रणबीर कपूर कायम चर्चेत असतो. अभिनेत्री आलिया भट्ट हिच्यासोबत लग्न झाल्यानंतर अभिनेत्याने लेकीचं मोठ्या आनंदात स्वागत केलं. आलिया – रणबीर यांच्या लेकीचं नाव राहा कपूर असं आहे. राहा हिचे देखील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.