Karisma Kapoor | रणधीर कपूर यांनी कधीच सोडली नाही लेकीची साथ, करिश्माच्या दुसऱ्या लग्नाबद्दल म्हणाले…

| Updated on: Jul 17, 2023 | 1:43 PM

घटस्फोटानंतर Karisma Kapoor हिने का घेतला नाही दुसऱ्या लग्नाचा निर्णय; श्रीमंत उद्योजकाकडून लग्नाचा प्रस्ताव देखील आला होता; लेकीच्या दुसऱ्या लग्नाबद्दल रणधीर कपूर यांची मोठी प्रतिक्रिया

Karisma Kapoor | रणधीर कपूर यांनी कधीच सोडली नाही लेकीची साथ, करिश्माच्या दुसऱ्या लग्नाबद्दल म्हणाले...
Follow us on

मुंबई, 17 जुलै 2023 : चढ – उतार प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. पण आयु्ष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटात कुटुंबाची साथ असेल तर कोणतीच अडचण कठीण वाटत नाही. अभिनेत्री करिश्मा कपूर हिच्या खासगी आयुष्यात देखील अनेक चढ – उतार आले. पण अभिनेत्रीचे वडील रणधीर कपूर यांनी कधीच लेकीची साथ सोडली नाही. करिश्मा कपूर हिचं नाव बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत जोडण्यात आलं. पण कोणत्याही अभिनेत्यासोबत अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अखेर अभिनेत्री आईच्या इच्छेनुसार एका श्रीमंत उद्योजकासोबत लग्न केलं. पण उद्योजकासोबत देखील करिश्माचं नातं टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असताना करिश्मा कपूर हिने उद्योजक संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर काही वर्षांनी जेव्हा करिश्माने सासरच्या मंडळींवर घरगुती हिंसाचाराचे आरोप लावले, तेव्हा अभिनेत्रीच्या कुटुंबियांसोबतच चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला.

संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांना दोन मुलं आहेत. संजय कपूर याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर करिश्माचं नाव दिल्लीतील उद्योजक संदीप तोशनीवाल यांच्यासोबत जोडलं जावू लागलं. एवढंच नाही तर, संदीप तोशनीवाल यांनी अभिनेत्रीला लग्नासाठी मागणी घातली होती. अशा अनेक चर्चा देखील रंगल्या.

हे सुद्धा वाचा

पण पहिलं लग्न अपयशी ठरल्यानंतर अभिनेत्रीने कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. अभिनेत्रीने दोन मुलांसोबत पूर्ण आयुष्य राहण्याचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयात करिश्माचं कुटुंब तिच्यासोबत होतं. अभिनेत्रीचे वडील रणधीर कपूर यांनी देखील लेकीच्या दुसऱ्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं.

रणधीर कपूर म्हणाले होते की, ‘दुसरा संसार थाटण्याची करिश्माची इच्छा नाही आणि मी कायम तिच्यासोबत असेल. तिची आणि तिच्या मुलांची इच्छा असेल तर माझी काही हरकत नाही. पण मला नाही वाटतं करिश्माची मुलं कधी आईच्या दुसऱ्या लग्नासाठी तयार होतील आणि मला नाही वाटत यात काही चुकीचं आहे…’ असं देखील रणधीर कपूर म्हणाले होते.

करिश्मा आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर करिश्माच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिच्या प्रत्येक फोटोवर चाहते देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.