Rani Mukerji : अभिनेत्री राणी मुखर्जी आज बॉलिवूडपासून दूर असली तरी चाहत्यांमध्ये मात्र कायम चर्चेत असते. राणीच्या अनेक गोष्टी आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. अभिनेत्रीबद्दल रंगणारी एक गोष्ट म्हणजे, एकदा राणीचे सासरे यश चोप्रा यांनी अभिनेत्रीला धमकावलं होतं. पण या घटनेनंतर चोप्रा आणि मुखर्जी कुटुंबातील नातं आणखी घट्ट झालं. नेमकं असं काय झालं होतं, ज्यामुळे यश चोप्रा यांनी राणीला धमकावलं होतं? हे प्रकरण माहिती पडल्यानंतर तुम्ही देखील हैराण व्हाल. राणीचे आई – वडील लेकीचा निरोप घेवून यश चोप्रा यांच्या ऑफिसमध्ये पोहोचले होते. तेव्हा यश चोप्रा यांनी राणीच्या आई – वडिलांना खोलीत कैद करुन ठेवण्याची धमकी दिली.
२००२ मध्ये यशराज फिल्मसोबत ‘मुझसे दोस्ती करोगे’ सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारल्यानंतर राणी जवळपास आठ महिने रुपेरी पडद्यापासून दूर होती. एवढंच नाही तर, ‘कुछ कुछ होता है’ सिनेमात टीना ही भूमिका साकारण्यासाठी राणी सतत नकार देत होती. मुलीची वागणूक पाहून राणीचे आई – वडील देखील हैराण होते.
एका मुलाखतीत राणी म्हणाली, ‘मी घरात बसून काहीही करत नव्हाती. पण मला कोणत्याही सिनेमात काम करायचं नव्हतं.’ त्यानंतर यश चोप्रा यांनी २००२ साली ‘साथिया’ सिनेमासाठी विचारणा केली. तेव्हा राणीने आई – वडिलांना यश चोप्रा यांच्याल ऑफिसमध्ये नकार देण्यासाठी पाठवलं.
राणीच्या आई – वडिलांनी ‘साथिया’ सिनेमासाठी नकार दिल्यानंतर यश चोप्रा यांनी राणीला फोन केला आणि म्हणाले, ‘सिनेमा तुझ्यासाठी लिहिला आहे. सिनेमासाठी जोपर्यंत तुझा होकार येत नाही, तोपर्यंत तुझ्या आई – वडिलांना याठिकाणी बंद करुन ठेवेल…’ यश चोप्रा यांनी दिलेल्या धमकीनंतर राणी हैराण झाली आणि सिनेमासाठी होकार दिला.
‘साथिया’ सिनेमात राणी मुखर्जी हिने अभिनेता विवेक ओबेरॉय याच्यासोबत स्क्रिन शेअर केली. सिनेमातील राणी आणि विवेक यांच्या केमिस्ट्रीची चर्चा आजही चाहत्यांमध्ये कायम रंगत असते. सिनेमातील गाणी आजही चाहत्यांच्या लक्षात आहे.
त्यानंतर राणीने यश चोप्रा यांचं पूत्र आदित्य चोप्रा याच्यासोबत लग्न केलं. आदित्य आणि यश यांना एक मुलगी देखील आहे. राणी आता तिच्या कुटुंबासोबत आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे. शिवाय अनेक कार्यक्रमांमध्ये देखील राणीला स्पॉट करण्यात येतं.