बॉलिवूडमधील अनेक प्रतिष्ठित कुटुंबाची चर्चा चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर रंगलेली असते. आता देखील एका प्रसिद्ध कुटुंबाची चर्चा तुफान रंगली आहे. अभिनेता शाहरुख खान, अभिनेता सलमान खान यांच्या कुटुंबाची चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेली असते. शिवाय त्याच्या संपत्तीची चर्चा देखील चाहत्यांमध्ये असते. तर महानायक अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबातील प्रत्येकाच्या कमाईचा आकडा फार मोठा आहे. पण अभिनेत्री राणी मुखर्जी हिचे पती आदित्य चोप्रा सुपरस्टार, अभिनेते नसताना देखील गडगंज पैसा कमावतात.
चोप्रा कुटुंबियांबद्दल सांगायचं झालं तर, देशाची फाळणी झाल्यानंतर राज चोप्रा यांची दोन्ही मुलं भारतात आली आणि त्यांनी झगमगत्या विश्वात स्वतःची ओळख निर्माण केली. बीआर चोप्रा आणि यश चोप्रा बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचले. चोप्रा कुटुंबाच्या चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात.
चोप्रा कुटुंबात आदित्य चोप्रा, उदय चोप्रा, राणी मुखर्जी, अभिय चोप्रा, रवी चोप्रा यांचा समावेश होतो. रिपोर्टनुसार, चोप्रा कुटुंबात एकट्या आदित्य चोप्रा यांची नेटवर्थ 7500 कोटी रुपये आहे. चोप्रा कुटुंबियांकडे दोन फिल्म स्टुडिओंचे मालकी हक्क आहेत. आदित्य चोप्रा ‘यश राज फिल्म्स’चे अध्यक्ष आहेत.
एवढंच नाहीतर, त्यांच्याकडे जुहू आणि नवी मुंबईत बंगले आणि अनेक महागड्या गाड्या देखील आहेत. ‘YRF’ च्या माध्यमातून आदित्य वर्षाला 961 कोटी रुपयांचा कमाई करतात. राणीच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर, रिपोर्टनुसार, 2021 मध्ये राणी हिची संपत्ती 12 मिलियन कोटी म्हणजे भारतीय चलना नुसार, 90 कोटी रुपये आहे.
आदित्य आधीच विवाहित होते. त्यांच्या पहिल्या पत्नीची आजी पायल खन्ना होतं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर 2009 मध्ये आदित्य यांचा घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर आदित्य यांनी राणी मुखर्जी हिच्यासोबत लग्न केलं.
राणी आणि आदित्य यांनी 2014 मध्ये लग्न केलं. त्यांना एक मुलगी देखील आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या सर्वत्र राणी आणि आदित्य यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.