राणी मुखर्जीच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

| Updated on: Mar 14, 2025 | 12:28 PM

Rani Mukherjee: अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. निधनामुळे संपूर्ण मुखर्जी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मुखर्जी कुटुंबाची चर्चा.

राणी मुखर्जीच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
Follow us on

बॉलिवूड विश्वातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. राणी मुखर्जी हिचे काका आणि ज्येष्ठ अभिनेते देब मुखर्जी यांचं निधन झालं आहे. देब मुखर्जी हे प्रसिद्ध दिग्दर्शक अयान मुखर्जी याचे वडील आहे. देब मुखर्जी यांच्या निधनामुळे संपूर्ण मुखर्जी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देव मुखर्जी हे आजारी होते आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान देब मुखर्जी यांचं निधन झालं. देब मुखर्जी यांचं संपूर्ण कुटुंब सध्या रुग्णालयात असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे.

वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधामुळे सिनेविश्वात शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटी आणि चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून देब मुखर्जी यांनी श्रद्धांजली वाहत आहेत. देब मुखर्जी यांच्या निधनामुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे.

हे सुद्धा वाचा

देब मुखर्जी यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ‘तू ही मेरी जिंदगी’, ‘आँसू बन गये फूल’, ‘अभिनयी’, ‘जो जीता वही सिकंदर’, ‘कमीने’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये त्यांनी दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देव मुखर्जी मोठ्या पडद्यावर सक्रिय होते. मुखर्जी कुटुंबाच्या चार पिढ्यांनी बॉलिवूवर राज्य केलं आहे.

काजोल हिच्यासोबत काय आहे नातं?

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोल हिच्यासोबत देब मुखर्जी यांचं खास कनेक्शन आहे. देब मुखर्जी हे नात्याने काजोलचे काका होते. तर ‘लगान’ यांसारख्या अनेक हीट सिनेमांचे दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर त्यांचे जावई होते. देब मुखर्जी यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होते. इंडस्ट्रीतील लोक त्यांना देबू दा या नावाने ओळखत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, 2 मार्च रोजी देब मुखर्जी यांचा नातू आणि आशुतोष गोवारीकर यांचा मुलगा कोणार्क गोवारीकर यांचं लग्न झालं. आजारपणामुळे देब या लग्नाला उपस्थित राहू शकले नाहीत. या लग्नात शाहरुख खानसह फिल्म इंडस्ट्रीतील अनेक स्टार्स सहभागी झालं होते.