अमिताभ बच्चन यांच्यासोबत रेखा यांचं चांगले संबंध नव्हते… अनेक वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्याने सोडलं मौन

| Updated on: Mar 19, 2025 | 1:25 PM

अनेक वर्षांनंतर बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितलं रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या संबंधाबाबत..., 'रेखा दिग्दर्शकांना घराबाहेर प्रतीक्षा करायला लावयच्या आणि...'

अमिताभ बच्चन यांच्यासोबत रेखा यांचं  चांगले संबंध नव्हते... अनेक वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्याने सोडलं मौन
Follow us on

बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा आणि महायनायक अमिताभ बच्चन यांच्या नात्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. स्वतः रेखा यांनी बिग बी यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल अनेकदा सांगितलंय. पण अमिताभ बच्चन कायम रेखा यांच्यासोबत असलेल्या नात्यावर मौन बाळगून राहिले. नुकताच, बॉलिवूडचे खलनायक रंजीत यांनी रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला. शिवाय सेटवर रेखा यांचे किती नखरे असायचे यावर देखील रंजीत यांनी मौन सोडलं आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत रंजीत म्हणाले, ‘सतत सारख्याच भूमिका मिळत असल्यामुळे मी त्रस्त झालेलो. जवळपास 10 वर्ष मी कोणत्याच सिनेमासाठी होकार दिला नाही. अखेर कंटाळून मी स्वतःचा सिनेमा तयार करण्याचा निर्णय घेतला. इंडस्ट्रीमध्ये काम करत असल्यामुळे अभिनेत्यांसोबत माझे अनेक अभिनेते मित्र होते. पण माझ्या सिनेमांत काम करण्यासाठी मी त्यांना मानधन द्यायचो…’

‘एका सिनेमासाठी मी रेखा यांना देखील विचारलं होतं. मी रेखा यांना सांगितलं, आपल्यामध्ये चांगले संबंध आहेत, त्यामुळे मला तुमचे एका सिनेमासाठी मानधन सांगा. पण नंतर मला कळलं की त्यांना दुसऱ्या कोणीतरी सिनेमासाठी साइन केलं होतं. मला सांगितलेल्या रकमेपेक्षा तो त्यांना 5 लाख रुपये कमी देत ​​होता.’

हे सुद्धा वाचा

रंजीत यांनी दावा केला की, ‘रेखा त्यावेळी एका सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त होत्या. त्यामुळे रात्रंदिवस काम करून माझ्या सिनेमाचं शूटिंग पूर्ण करणार असल्याचं अभिनेत्रीने मला सांगितलं. तेव्हा रंजीत संतापले आणि कडक शब्दात म्हणाले की, मी हा सिनेमा तुमच्यासाठी नाही तर माझ्यासाठी बनवत आहे.’

रंजीत यांनी कळलं होतं की रेखा त्यांच्यासोबत देखील इतर दिग्दर्शकांप्रमाणे व्यवहार करेल. ‘मला आणि माझ्या टीमला रेखा यांच्या घराबाहेर प्रतीक्षा करावी लागेल. म्हणून मी रेखा यांना सांगितलं माझी सायनिंग रक्कम परत करा…’ एवढंच नाही तर, यावेळी रंजीत यांनी रेखा आणि बिग बी यांच्या नात्याबद्दल देखील सांगितलं.

रंजीत म्हणाले, ‘सुरुवातीच्या दिवसांत रेखा आणि अमिताभ बच्चन यांचे संबंध चांगले नव्हते. पण नंतर दोघांमधील मैत्री घट्ट झाली. त्यामुळे रेखा यांना मुंबईत राहायचं होतं. पण मला सिनेमासाठी फार्ममध्ये शूट करायचं होतं. जे मुंबईच्या बाहेर होतं. त्यामुळे रेखा यांना संध्याकाळी पुन्हा घरी यायचं होतं.’
‘रेखा मला म्हणाल्या होत्या, दिवसा शूट पूर्ण करु… मला रात्री घरी परतायचं आहे. रेखा यांना कोरिओग्राफरच्याही अडचण होती. त्यामुळे कोरियोग्राफर देखील बदलण्यात आला… असं देखील रंजीत नुकताच झालेल्या मुलाखतीत म्हणाले.