मुंबई – पुष्पा चित्रपट (Pushpa: The Rise) प्रदर्शित झाल्यानंतर त्या चित्रपटाची गाणी इतकी प्रसिध्द झाली की, लोकांना अक्षरशः वेड लागण्याची चर्चा अनेक ठिकाणी ऐकायला मिळाली. अल्लू अर्जुन (allu arjun) यांने केलेला श्रीवल्ली गाण्याचा डान्सतर आजही आपण अनेकजण करत असल्याचे पाहतो. त्या गाण्याला इतकी प्रसिध्दी मिळाली जगभरात त्याचे व्हि़डीओ तयार झाले. अगदी खेळाडूंपासून सामान्य माणसापर्यंत त्याचे व्हिडीओ तयार झाले, यामध्ये अनेक परदेशी क्रिकेट खेळाडू सुध्दा होते. तसेच त्यांच्य चाहत्यांकडून त्यांचं कौतुकही झालं. पुष्पा चित्रपटाने मोठा गल्ला केल्याची देखील चर्चा जोरात आहे. कारण त्या चित्रपटातील स्टोरी लोकांच्या इतकी पसंतीला पडली की, अनेकांनी तो चित्रपट अनेकदा पाहिला आहे. रानू मंडलने (ranu mandal) सुध्दा त्या गाण्यावर डान्स केला आहे, त्यामुळे ती पुन्हा चर्चेत आल्याचे पाहायला मिळत आहे. पण रानूला पुष्पा चित्रपटातल्या श्रीवल्ली गाण्यावर डान्स केल्यामुळे नेटक-यांनी ट्रोल केल्याचे पाहायला मिळत आहे.
रानू मंडलचा डान्स व्हिडीओ व्हायरल
इसी बीच तेरी मेरी कहाणी गाण्याच्या गायिका रानू मंडळ यांचा एक व्हिडीओ नुकताच व्हायल झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामध्ये रानु मंडल अत्यंत साध्या कपड्यात दिसत असून ती पुष्पा चित्रपटातल्या श्रीवल्ली या गाण्यावर डान्स करीत असल्याचा व्हिडीओ आहे. व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे रानू मंडलने त्या व्हिडीओत मजेदार डान्स केला आहे. ती एकदम साध्या कपड्यात दिसत असून त्या गाण्यावर डान्सची मज्जा घेत असल्याचे दिसते. त्यामुळे अनेक नेटक-यांनी तिला सोशल मीडियावरती ट्रोल केल्याचे पाहायला मिळत आहे.
नेटक-यांनी केलं ट्रोल
रानू मंडलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिला अनेकांनी प्रश्न विचारल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच ती तिच्या गावाकडच्या घराच्या बाजूला असून तिच्या व्हिडीओ काहींना आवडला आहे, तर काहींनी तिच्यावर जोरदार टीका केली आहे. सोशल मीडियामुळे एका रात्रीत स्टार झालेली रानू मंडलला तिचं आयुष्य पहिल्या सारखं जगतं असल्याची पाहायला मिळत आहे. तिच्या इंग्रजी बोलण्य़ावरून तिला अनेकदा नेटक-यांकडून ट्रोल केलं जातं. तसेच तिला अनेकदा तिच्या कपड्यावरून ट्रोल केलं जातं. तिला हिमेश रेशमिया याने एक चान्स दिला होता, त्यावेळी देखील तिच्या मेकअपमुळे तिला अनेकांनी ट्रोल केले होते. सोशल मीडियावर तुम्ही प्रसिध्दीच्या झोतात आल्यानंतर तुम्हाला ती प्रसिध्दी टिकवावी लागते असं वाटतंय.