मुंबई : डॉन 3 चित्रपटामध्ये आता बाॅलिवूडचा अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) हा दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुपरहिट फ्रेंचाइजी डॉनचे आता नवे युग सुरू झाले आहे. अगोदर अमिताभ बच्चन नंतर शाहरूख खान (Shah Rukh Khan) आणि आता रणवीर सिंहला ही संधी मिळाली आहे. इतकेच नाही तर नुकताच डॉन 3 चे टीझर देखील रिलीज करण्यात आले आहे. मात्र, शाहरुख खान हा डॉन 3 (Don 3) मध्ये दिसणार नसल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी निराशा ही बघायला मिळत आहे.
शाहरुख खान याचे चाहते सोशल मीडियावर संताप व्यक्त करताना देखील दिसत आहेत.
डॉन 3 मध्ये शाहरुख खान हा दिसणार नसल्याने चाहते फक्त संताप व्यक्त करत नाहीयेत तर रणवीर सिंह याला टार्गेट करताना देखील दिसत आहेत. अनेकांनी डॉन 3 मध्ये रणवीर सिंह हा दिसणार असल्याचे कळाल्यापासून नाराजी व्यक्त करण्यास सुरूवात केली.
सोशल मीडियावर रणवीर सिंह विरोधात लोकांचा रोष वाढत आहे. शेवटी आता यावर रणवीर सिंह याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. इतकेच नाही तर या पोस्टसोबतच रणवीर सिंह याने आपले लहानपणीचे दोन फोटो देखील शेअर केले आहेत. या पोस्टच्या माध्यमातून रणवीर सिंह हा आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहे.
या पोस्टमध्ये त्याने शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांचा उल्लेख देखील केला. रणवीर सिंह याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, भगवान…यासाठी मी गेल्या कित्येक वर्षांपासून वाट पाहत होतो. इतरांप्रमाणेच लहानपणापासून मला चित्रपट प्रचंड आवडतात मी चित्रपटांच्या प्रेमात पडलो होता.
अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान मला आवडतात, ते हिंदी चित्रपटसृष्टीचे G.O.A.T आहेत. मी त्यांच्यासारखे बनण्याचे स्वप्न पाहत मोठा झालो. अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांना पाहूनच मी मोठा झालो. मी आज जसाही व्यक्ती आणि अभिनेता आहे तो त्यांच्यामुळेच. त्याचा वारसा पुढे नेणे हे माझे लहानपणीचे स्वप्न आता पूर्ण होत आहे.
डॉनचा भाग होणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आणि मोठी जबाबदारी नक्कीच आहे. मला यासाठी संधी मिळाली हिच मोठी गोष्ट आहे. पुढे रणवीर सिंह हा फरहान आणि रितेश यांचे धन्यवाद मानताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून रणवीर सिंह याचे चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत आहेत. सर्कस हा चित्रपट देखील रणवीर सिंह याचा फ्लाॅप गेला.