मुंबई : कॉफी विथ करण सीजन 8 (Koffee with Karan 8) मुळे करण जोहर हा चर्चेत आहे. कॉफी विथ करण 8 ला लवकरच सुरूवात होणार आहे. या सीजनबद्दल चाहत्यांमध्ये मोठे क्रेझ हे बघायला मिळतंय. विशेष म्हणजे दरवेळीच कॉफी विथ करण शोमध्ये काही मोठे खुलासे होताना दिसतात. या शोमध्ये बाॅलिवूड (Bollywood) कलाकार उपस्थित राहतात. यावेळी करण जोहर हा कलाकारांना त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल प्रश्न विचारताना दिसतो. बऱ्याच वेळा कॉफी विथ करण शो वादात देखील सापडतो.
कॉफी विथ करण सीजन 8 मुळे सध्या करण जोहर हा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर दिसतोय. लोक करण जोहर याला खडेबोल सुनावताना दिसत आहेत. कारण या सीजनला मोठ्या प्रमाणात स्टार किड्स हे सहभागी होताना दिसणार आहेत. यामुळे करण जोहर हा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आल्याचे बघायला मिळतंय. सुहाना खान देखील कॉफी विथ करणमध्ये सहभागी होणार आहे.
सध्या सोशल मीडियावर कॉफी विथ करण सीजन 8 चा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे सहभागी झाल्याचे बघायला मिळतंय. कॉफी विथ करण सीजन 8 मध्ये करण जोहर याच्यासोबत मस्ती करताना दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे दिसत आहेत.
Deepika Padukone and Ranveer Singh on Koffee With Karan pic.twitter.com/mwHUwTLBdN
— elitestanning (@elitestanning) October 22, 2023
यावेळी बोलताना थेट रणवीर सिंह हा करण जोहर याला ठरकी अंकल म्हणतो. रणवीर सिंह याचे हे बोलणे ऐकून करण जोहर याला सुरूवातीला थोडा धक्का बसला. मात्र, त्यानंतर लगेचच रणवीर सिंह याला करण जोहर हा म्हणतो की, तुला तर मी नंतर बघतो. यावेळी दीपिका पादुकोण ही शांत बसताना दिसली.
आता करण जोहर, रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतर लोक रणवीर सिंह याचा सपोर्ट करताना दिसत आहेत. यावर कमेंट करत एकाने लिहिले की, रणवीर सिंह हा अगदी बरोबर या करण जोहर याच्याबद्दल नक्कीच बोलला आहे.