दीपिका पादुकोणला प्रेग्नेंसीमध्ये होतोय त्रास, अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

| Updated on: May 22, 2024 | 11:14 AM

Deepika Padukone : प्रेग्नेंसीच्या पाचव्या महिन्यात दीपिका पादुकोण हिला होता 'या' गोष्टीचा त्रास, खुद्द अभिनेत्री खुलासा करत म्हणाली..., सध्या सर्वत्र दीपिका हिच्या खासगी आयुष्याच्या चर्चा... सप्टेंबर महिन्यात दीपिका - रणवीर यांच्या आयुष्यात होणार नव्या पाहुण्याचं आगमन...

दीपिका पादुकोणला प्रेग्नेंसीमध्ये होतोय त्रास, अभिनेत्रीने केला मोठा खुलासा
Follow us on

अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या अभिनयापासून दूर आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी दीपिका आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. आता देखील अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने तिला होत असलेल्या त्रासाबद्दल सांगितलं आहे. प्रेग्नेंसी काळात दीपिका हिला वातावरणात होत असलेल्या बदलाचा त्रास होत आहे.

पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली, ‘मी एसी चालू करते तेव्हा मला थंडी वाजते. पण जेव्हा मी एसी बंद करते तेव्हा मला गरम होतं.. या त्रासात सध्या मी अडकली आहे… ‘ मुंबईच्या गरमीमुळे गरोदर दीपिका त्रस्त आहे… सध्या सर्वत्र दीपिका हिने शेअर केलेल्या पोस्टची चर्चा रंगली आहे…

सांगायचं झालं तर, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यंनी मार्च महिन्यात आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. वयाच्या 38 व्या वर्षी दीपिका पहिल्यांदा आई होणार आहे. नुकताच, दीपिका – रणवीर बेबीमूनसाठी गेले होते. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. सप्टेंबर महिन्यात दीपिका – रणवीर यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.

दीपिका हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, जानेवारी महिन्यात दीपिका अभिनेता हृतिक रोशन याच्यासोबत ‘फायटर’ सिनेमात दिसली होती. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील तगडी कमाई केली. आता दीपिका पादुकोण – रणवीर सिंग दोघे देखील दिग्दर्शक रोहीत शेट्टी याच्या ‘सिंघम अगेन’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत.

सिनेमाचे काही पोस्टर देखील दीपिका – रणवीर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सिनेमात दोघांसोबत अजय देवगन, अक्षय कुमार, अर्जुन कपूर, करीना कपूर, टायगर श्रॉफ यांच्यासोबत अन्स सेलिब्रिटी देखील झळकणार आहेत.

सध्या दीपिका अभिनयापासून दूर असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडियावर दीपिका कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर दीपिका हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.