मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आपल्या कपड्यांच्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो. रणवीर अनेक शो आणि कार्यक्रमात रंगीबेरंगी किंवा थोड्या हटके स्टाईलचे कपडे घालतो. त्याच्या या स्टाईलमुळे बऱ्याचदा सोशल मीडियावर रणवीर सिंहला ट्रोल करण्यात येते. मात्र, रणवीर सिंहचा कमाईचा आकडा कोरोना काळातही वाढला आहे. रणवीरने 9 नवीन ब्रँड्ससोबत करार केला आहे. त्यामुळे त्याची कमाई 7 वरून 12 कोटी झाली आहे. त्यांच्या ब्रँडची एकूण संख्या आता 34 झाली आहे. (Ranveer Singh’s earnings increase, 9 new brands sign deals)
रणवीर सिंहने टेलिकॉम, बांधकाम क्षेत्र, शिक्षण, आरोग्य सेवा, सॅनिटरी वेअर, टुरिझम ब्रँड्ससोबत करार केले आहेत. रणवीर सिंहला इंस्टाग्रामवर 34.7 दशलक्ष लोक फॉलो आहेत. रणवीर काही फोटो सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत होतात. काही दिवसांपूर्वी रणवीरला वांद्रे येथील डबिंग स्टुडिओच्या बाहेर स्पॉट केले गेले होते. त्यावेळी रणवीरने ट्रॅकसूट घातला होता आणि काळ्या रंगाचा मास्क घातला होता. मात्र, रणवीरचा हा लूक चाहत्यांना आवडलेला दिसत नव्हता. या फोटोवर चाहते गंमतीशीर कमेंट करताना दिसत होते.
रणवीर सिंह 83 चित्रपटामध्ये लवकरच दिसणार आहे. हा चित्रपट 1983 च्या वर्ल्डकपमध्ये भारताने ऐतिहासिक विजयावर आधारीत आहे. रणवीर सिंह यामध्ये कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोणही कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. लग्नानंतर रणवीर आणि दीपिका पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. दीपवीरचे चाहतेही या दोघांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या :
रिलीजआधीच कमाईत बाप, बाहुबलीचा बाप ठरत असलेली फिल्म RRR बद्दल जाणून सर्व काही !
‘बाहुबली’चा बाप येतोय, रिलीजच्या आधीच 348 कोटींची कमाई पक्की !
‘या मुर्खांना कुणी कामावर ठेवलं’, भारतीय कलाकारांच्या ट्विट मालिकेवर हॉलिवूड बरसलं
(Ranveer Singh’s earnings increase, 9 new brands sign deals)