बादशाह महाराष्ट्र पोलिसांच्या निशाण्यावर, रॅपरच्या अडचणीमध्ये मोठी वाढ, ते प्रकरण भोवणार?

| Updated on: Oct 30, 2023 | 7:34 PM

बादशाह याने एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवलाय. बादशाह याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. बादशाह हा सोशल मीडियावर देखील सक्रिय असतो. चाहत्यांसाठी खास व्हिडीओ शेअर करताना दिसतो.

बादशाह महाराष्ट्र पोलिसांच्या निशाण्यावर, रॅपरच्या अडचणीमध्ये मोठी वाढ, ते प्रकरण भोवणार?
Follow us on

मुंबई : रॅपर आणि गायक बादशाह याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. ऑनलाइन बेटिंग कंपनी अॅप फेअरप्ले प्रकरणात बादशाह याचे नाव आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. विशेष म्हणजे या प्रकरणात महाराष्ट्र पोलिस चांगलेच सक्रिय झाल्याचे देखील बघायला मिळतंय. या प्रकरणात थेट बादशाह याची चाैकशी महाराष्ट्र पोलिसांकडून केली गेलीये. आता या प्रकरणात मोठे खुलासे होणार असल्याचे स्पष्ट आहे.

रिपोर्टनुसार सोमवारी महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने ऑनलाइन सट्टेबाजी कंपनी फेअरप्लेच्या अॅपप्रकरणी बादशाहची चौकशी झालीये. धक्कादायक गोष्ट म्हणजे या प्रकरणात फक्त बादशाह याचेच नाव नाही तर इतरही अनेक कलाकारांची नावे ही पुढे आलीत. यामुळे बाॅलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाल्याचे देखील बघायला मिळतंय.

या प्रकरणात बादशाह आणि इतर कलाकारांचे पाय खोलात अडकल्याचे स्पष्टपणे बघायला मिळतंय. बादशाह याच्यावर थेट महादेव गेमिंग अॅपची उपकंपनी असलेल्या फेअरप्लेची जाहिरात करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. विशेष म्हणजे यासाठी बादशाह याने तगडी रक्कम घेतल्याचे देखील सांगितले जातंय.

या अॅपचे जोरदार प्रमोशन करताना बादशाह हा दिसला. आता हेच बादशाह याच्या अंगलट झाल्याचे बघायला मिळतंय. फेअरप्लेने आयपीएल 2023 चे स्क्रीनिंग केले होते. बादशाह याच्यासोबत या प्रकरणात संजय दत्त, रणबीर कपूर, कपिल शर्मा आणि बाॅलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचे देखील नावे पुढे आली आहेत.

लवकरच पोलिसांकडून आता बादशाह याच्यानंतर संजय दत्त, रणबीर कपूर, कपिल शर्मा, श्रद्धा कपूर यांची चाैकशी केली जाऊ शकते. यापूर्वीच महादेव गेमिंग अॅप प्रकरणात रणबीर कपूर याला थेट ईडीने समन्स पाठवला. ज्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. या प्रकरणात रणबीर कपूर याच्यावर अनेक गंभीर आरोप हे करण्यात आले.