मुंबई : अभिनेत्री रश्मिका मंदाना ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. रश्मिका मंदाना हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. रश्मिका मंदाना हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे रश्मिका मंदाना हिचे हे चित्रपट चांगलाच धमाका करताना दिसत आहेत. साऊथनंतर बाॅलिवूडमध्ये धमाका करताना रश्मिका मंदाना ही दिसतंय. नुकताच रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांचा ॲनिमल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.
ॲनिमल चित्रपटाला प्रेक्षकांचे जोरदार प्रेम मिळाले. हेच नाही तर पहिल्यांदाच ॲनिमल चित्रपटाच्या माध्यमातून रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांची जोडी धमाका करताना दिसली. नुकताच आता रश्मिका मंदाना हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमुळे रश्मिका मंदाना ही चर्चेत आलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना रश्मिका मंदाना दिलीये.
रश्मिका मंदाना हिने नुकताय खुलासा केलाय की, ॲनिमल चित्रपटाच्या एका सीननंतर तिची अवस्था ही नेमकी कशी होती. ॲनिमल चित्रपटाच्या एका सीनमध्ये रश्मिका मंदाना हिला रणबीर कपूर याच्या कानाखाली मारायची होती. यावेळी हा सीन करणे रश्मिका मंदाना हिच्यासाठी सर्वात अवघड काम होते.
रश्मिका मंदाना हिने नुकताच सांगितले की, ज्यावेळी तिने सीनमध्ये रणबीर कपूर याच्या कानाखाली मारली त्यावेळी ती जोरात ओरडत होती आणि ती रडत होती. रश्मिका मंदाना म्हणाली, माझ्यासाठी खरोखरच हा सीन करणे खूपच जास्त अवघड काम होते. मी स्वत: हा सीन केल्यानंतर खूप जास्त घाबरले होते.
हेच नाही तर पुढे रश्मिका मंदाना म्हणाली, मी थोड्या वेळाने रणबीर कपूर याच्याकडे गेले आणि त्याला विचारले सर्व ठिक आहे ना? मी हा सीन करताना माझ्या मनात काय सुरू आहे हेच मला कळत नव्हते. मला फक्त सांगण्यात आले की, एका पतीने पत्नीला चीट केले आणि तो सीन लक्षात ठेव. बाकी माझ्या मनात काहीच नव्हते.