Rashmika Mandanna : सुपरहिट ‘पुष्पा’ सिनेमात मुख्य भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य करणारी रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. रश्मिका आता फक्त साउथ सिनेविश्वासाठी मार्यादित राहिली नसून अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केलं आहे. रश्मिका तिचे सिनेमे आणि स्टाईलमुळे कायम चर्चेत असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. शिवाय अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. त्यामुळे अभिनेत्रीबद्दल कोणतीही छोटी गोष्ट देखील चाहत्यांपर्यंत लगेच पेहोचते. सध्या रश्मिका तिच्या संपत्तीमुळे चर्चेत आहे.
गेल्या पाच वर्षांत रश्मिाका हिने पाच आलिशान फ्लॅट्स खरेदी केल्याची चर्चा रंगली. एका ट्विटर अकाउंटवर लिहिलं होतं की, ‘तुम्हाला माहिती आहे? पाच वर्षांच्या करियरमध्ये रश्मिका हिने पाच आलिशान फ्लॅट्स खरेदी केलं आहेत. गोवा, हैदरबाद, कूर्ग, मुंबई आणि बेंगलुरू याठिकाणी रश्मिकाचे आलिशान फ्लॅट्स आहेत…’ अशी चर्चा रंगली होती. (Rashmika Mandanna owner of 5 flats)
पाच आलिशान फ्लॅट्सबद्दल चर्चा रंगत असल्याचं कळताच अभिनेत्रीने मोठा खुलासा केला. ट्विटला उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, ‘असं झालं असतं तर…’, एवढंच नाही तर, अभिनेत्रीने चाहत्यांना एक सकारात्मक मेसेज देखील दिला. ‘कायम आनंदी राहा मित्रांनो… आपेक्षा ठेवा… तुमचा आनंद आणि शांती प्रत्येक गोष्टीच्या आधी येतो… नकारात्मक गोष्टी अनुभवण्यासाठी आयुष्य प्रचंड लहान आहे. ‘ असं अभिनेत्री म्हणाली.
रश्मिका मंदाना तिच्या कुटुंबासोबत कर्नाटक येथील विराजपेट याठिकाणी राहते. रश्मिकाने २०२१ मध्ये एक फोटो पोस्ट केला होता, ज्यामध्ये तिने गोवा याठिकाणी नवं घर घेतल्याचं दिसून आलं. अभिनेत्री मुंबई आणि हैदराबाद याठिकाणी अधिक शुटिंग करते. पण या दोन मोठ्या शहरांमध्ये अभिनत्रीचं घर आहे की नाही… हे अद्याप कळू शकलेलं नाही.
२०२१ मध्ये पुष्पा (pushpa) सिनेमाच्या माध्यमातून जगभरात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. ‘पुष्पा: द राइज’ सिनेमाने जगभरात एक वेगळा विक्रम रचला आहे. सिनेमाने जगभरात मोठी कमाई केली. सोबतच ‘श्रीवल्ली’ आणि ‘सामी सामी’ गाण्याने इंटरनेटवर भन्नाट कामगिरी केली. आजही सिनेमातील गाणी कोणत्याही कार्यक्रमात वाजत असतात. आता लवकरच ‘पुष्पा : द रुल’ सिनेमा येणार आहे. सिनेमात पुन्हा चाहत्यांना रश्मिका आणि अल्लू अर्जून यांची जोडी पाहायला मिळणार आहे.