Vijay Deverakonda सोबत डेटिंगच्या चर्चा रंगत असताना रश्मिका हिने कोणाला केलं प्रपोज? व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Feb 03, 2023 | 12:29 PM

विजय देवरकोंडा नाही तर, कोण आहे रश्मिका हिच्यासाठी अत्यंत खास, ज्या व्यक्तीला अभिनेत्रीने सर्वांसमोर केलं प्रपोज? व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण

Vijay Deverakonda सोबत डेटिंगच्या चर्चा रंगत असताना रश्मिका हिने कोणाला केलं प्रपोज? व्हिडीओ व्हायरल
Vijay Deverakonda सोबत डेटिंगच्या चर्चा रंगत आसताना रश्मिका हिने कोणाला केलं प्रपोज? व्हिडीओ व्हायरल
Follow us on

Vijay Deverakonda and Rashmika Mandanna : इंडस्ट्रीमध्ये कायम चर्चेत असणार विषय म्हणजे सेलिब्रिटींचे रिलेशनशिप. काधी कोणत्या अभिनेत्याचं नावं कोणत्या अभिनेत्रीसोबत जोडलं जाईल. याबद्दल काही सांगता येत आहे. कलाकारांचे काही सिनेमे प्रेक्षकांचं मनोरंजन करत नसले तरी, त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा मात्र कामय चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. पण आता अशा अभिनेता आणि अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, जे कायम चाहत्यांच्या अवती-भोवती असतात. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या नात्याची चर्चा रंगत आहे. पण दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

अभिनेता विजय देवरकोंडा याच्यासोबत नात्याच्या चर्चा रंगत असताना रश्मिकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री एका व्यक्तीला प्रपोज करताना दिसत आहे. सध्या रश्मिकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. (Vijay Deverakonda and Rashmika Mandanna )

हे सुद्धा वाचा

 

 

व्हिडीओमध्ये ‘पुष्मा’ फेम रश्मिका चुकून एका चाहत्याला प्रपोज करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये एक चाहता अभिनेत्रीला तेलुगूमधून मुलीला प्रपोज कसं करायचं विचारतो. यावर अभिनेत्री हसत इशारे करते आणि चाहत्याचं प्रश्नाचं उत्तर देते. पुढे चाहता अभिनेत्रीला ‘सेम टू यू’ म्हणतो. चाहत्यांच्या उत्तरानंतर रश्मिका हैराण होते. अभिनेत्रीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Vijay Deverakonda and Rashmika Mandanna love story)

दरम्यान, कुटुंबासोबत दुबईमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेणाऱ्या विजय देवरकोंडा याच्यासोबत रश्मिका देखील दिसत आहे. सध्या दोघांचे कुटुंबासोबत फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये विजय याच्यासोबत त्याचे काही मित्र दिसत आहेत. शिवाय अभिनेत्यासोबत रश्मिका देखील पोज देताना दिसत आहे.

 

 

महत्त्वाचं म्हणजे, विजय याचे ज्या ड्रेसमध्ये कुटुंबासोबत फोटो व्हायरल होत आहेत, अभिनेता त्याच ड्रेसमध्ये रश्मिकासोबत देखील दिसत आहे. म्हणून दोघे एकत्र कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण या फोटोंबद्दल विजय आणि रश्मिका यांनी काहीही सांगितलेलं नाही.

रश्मिका आणि विजय यांचे आगामी सिनेमे
नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘मिशन मजनू’ सिनेमात चाहते आणि विश्लेषकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. शांतनु बागची दिग्दर्शित सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. सिनेमा २० जानेवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स प्रदर्शित करण्यात आला.

आता रश्मिका लवकरच अभिनेता रणबीर कपूर यांच्यासोबत ‘एनिमल’ सिनेमात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. तर दुसरीकडे अभिनेता विजय देवकोंडा ‘कुशी’ सिनेमात अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिच्यासोबत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.