वयाच्या 27 व्या वर्षी रश्मिका मंदाना अडकणार विवाहबंधनात, साखरपुड्याची तारीख ठरली?

| Updated on: Jan 08, 2024 | 12:21 PM

Rashmika Mandanna : वयाच्या 27 व्या वर्षी रश्मिका मंदाना 34 वर्षीय अभिनेत्यासोबत अडकणार विवाहबंधनात? अभिनेत्रीच्या साखरपुड्याची तारीख ठरली! सर्वत्र रश्मिकाच्या वयाची चर्चा..., कोण आहे 'तो' अभिनेता?

वयाच्या 27 व्या वर्षी रश्मिका मंदाना अडकणार विवाहबंधनात, साखरपुड्याची तारीख ठरली?
Follow us on

मुंबई | 8 जानेवारी 2024 : अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘ॲनिमल’ सिनेमामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली. सिनेमातील अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत रश्मिका हिची केमिस्ट्री देखील चाहत्यांना प्रचंड आवडली आहे. पण आता रश्मिका तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रश्मिका मंदाना हिच्या साखपुड्याची चर्चा रंगली आहे. वयाच्या 27 व्या वर्षी रश्मिका मंदाना 34 वर्षीय अभिनेत्यासोबत विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगली आहे.

रश्मिका मंदाना हिच्यासोबत ज्या अभिनेत्याचं नाव जोडलं जात आहे, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता विजय देवरकोंडा आहे. गेल्या अनेक महिन्यापासून विजय आणि रश्मिका यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. एवढंच नाही तर, ‘ॲनिमल’ सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान रणबीर याने रश्मिका – विजय यांच्या नात्याबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या होत्या.

 

 

दरम्यान, रश्मिका हिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमुळे अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. एका सोशल मीडियावर युजरने रश्मिका हिचा फोटो एक्सवर पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘तू आमच्यासाठी नॅशनल क्रश आहेस… तुझ्यासारखी पत्नी मला देखील भेटेल… अशी अपेक्षा आहे…’

नेटकऱ्याच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत अभिनेत्री म्हणाली, ‘जेव्हा मी लग्न करेन, तेव्हा मला आशा आहे की माझा पती देखील माझ्याबद्दल एक अद्भुत पत्नी म्हणून विचार करेल….’ सध्या सर्वत्र रश्मिका हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना

रश्मिका प्रत्येक सणासाठी विजय याच्या घरी जाते. दोघांच्या साखरपुड्याची देखील सर्वत्र चर्चा रंगली आहे. रिपोर्टनुसरा, फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचा साखरपुडा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण यावर दोघांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.