मुंबई : रश्मिका मंदाना हिचा एक डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला. हा व्हिडीओ पाहून लोक चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळाले. हेच नाही तर सुरूवातीला अनेकांना वाटले की, रश्मिका मंदाना हिचा तो व्हिडीओ खराच आहे. मात्र, त्यानंतर या व्हिडीओची सत्यता पुढे आली आणि हा व्हिडीओ डीपफेक व्हिडीओ असल्याचे स्पष्ट झाले. रश्मिका मंदाना हिच्या व्हायरल होत असलेल्या डीपफेक व्हिडीओनंतर अनेक कलाकारांनी संताप व्यक्त केला. हेच नाही तर थेट अनेकांनी पोस्ट शेअर करत कारवाई करण्याची मागणीच करून टाकली.
आता नुकताच दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करत थेट आरोपीला ताब्यात घेतलंय. हेच नाही तर आरोपीकडून मोठे खुलासे देखील करण्यात आले आहेत. रश्मिका मंदाना हिचा डीपफेक व्हिडीओ तयार करणाऱ्या आरोपीचे नाव हे ई नवीन आहे. ई नवीनला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. ई नवीनने मोठे खुलासे केले आहेत.
पोलिसांनी नवीन याला आंध्र प्रदेशातील गुंटूर येथून ताब्यात घेतलंय. आता नवीन याच्याकडून मोठा खुलासा हा करण्यात आलाय. दिल्ली महिला आयोगाच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी 10 नोव्हेंबर रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आता पोलिसांकडून आरोपीला ताब्यात देखील घेण्यात आलंय.
दिल्ली पोलिसांनी आरोपीला शोधण्यासाठी तब्बल 500 हून अधिक सोशल मीडियावर अकाऊंटचा शोध घेतला. आता नवीन याने अखेर खुलासा करत सांगितले की, त्याने रश्मिका मंदाना हिचा तो डिपफेक व्हिडीओ का तयार केला. नवीन याच्या पेजचे 90 हजार फॉलोअर्स होते, रश्मिकाचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर त्याचे थेट फॉलोअर्स हे 1 लाखांपेक्षा अधिक झाले. आपल्या पेजचे फॉलोअर्स वाढवण्यासाठी आपण रश्मिकाचा तो डिपफेक व्हिडीओ तयार केल्याचे नवीन याने मान्य केले.
हेच नाही तर नवीन याने हे देखील सांगितले की, ज्यावेळी बाॅलिवूड कलाकारांनी या डीपफेक व्हिडीओच्या विरोधात पोस्ट केल्या आणि कारवाई करण्याची मागणी केली, ज्यावेळी मी खूप घाबरलो. त्यानंतर मी तो व्हिडीओ डिलीट करत थेट पेज देखील डिलीट केले. धक्कादायक म्हणजे नवीन याने सांगितले की, यूट्यूबवरून एडिटिंग शिकलो. अधिकचे पैसे कमावण्यासाठी आपण असे केले असे त्याने सांगितले.