Raveena Tandon : अक्षय कुमारच्या आधी ‘या’ अभिनेत्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली रवीना टंडन; मिळाला ‘वेडी’चा टॅग

| Updated on: Oct 26, 2023 | 11:25 AM

अभिनेत्री रवीना टंडनची 'लव्ह-लाइफ' नेहमीच चर्चेत होती. बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारसोबत तिचं अफेअर चांगलंच गाजलं होतं. मात्र त्यापूर्वी ती आणखी एका अभिनेत्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. मात्र या प्रेमाच्या बदल्यात तिला 'वेडी' असल्याचा टॅग मिळाला होता.

Raveena Tandon : अक्षय कुमारच्या आधी या अभिनेत्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली रवीना टंडन; मिळाला वेडीचा टॅग
Raveena Tandon
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 26 ऑक्टोबर 2023 | 90 च्या दशकात अभिनेत्री रवीना टंडनने एकापेक्षा एक भूमिका साकारत बॉलिवूड इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. रवीनाचा अभिनय, डान्स आणि सौंदर्याने प्रेक्षकांना अक्षरश: भुरळ घातली होती. यासोबतच ज्या गोष्टीची सर्वाधिक चर्चा होती ती म्हणजे, तिची लव्ह-लाइफ. रवीनाचं नाव अक्षय कुमारसोबत सर्वाधिक जोडलं गेलं. इंडस्ट्रीत या दोघांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा होत्या. रवीना अनेकदा या रिलेशनशिपबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. मात्र अक्षय कुमारच्या आधी तिचं नाव आणखी एका अभिनेत्याशी जोडलं गेलं होतं. त्या अभिनेत्याचं नाव आहे अजय देवगण. इतकंच नव्हे तर या नात्यामुळे तिला ‘वेडी’, ‘खोटारडी’ असे टॅगसुद्धा लागले होते.

रवीना टंडन आणि अजय देवगणने ‘दिलवाले’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. अजय देवगण हा करिश्मा कपूरच्या प्रेमात पडला होता आणि त्यामुळेच त्याने रवीनाला सोडलं, असं म्हटलं जातं. यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वादसुद्धा झाले होते. रवीनाने अनेक मुलांमध्ये अजयसोबतच्या नात्याची कबुली दिली होती. मात्र अजयने कधीच त्याचा स्वीकार केला नव्हता. इतकंच नव्हे तर रवीनाने असंही सांगितलं होतं की ती आणि अजय एकमेकांना प्रेमपत्र लिहायचे आणि ते पत्र आजसुद्धा तिच्याकडे आहेत. यावर अजयने असं म्हटलं होतं की जर तिच्याकडे खरंच ते पत्र असतील, तर तिने ते पब्लिश करावेत. अजयने रवीनावर ‘खोटारडी’ असल्याचाही ठपका ठेवला होता.

हे सुद्धा वाचा

एका मुलाखतीत अजयने सांगितलं होतं की रवीना त्याच्या बहिणीची मैत्रीण आहे. मात्र तो कधीच तिच्या जवळसुद्धा गेला नाही. अजयसाठी रवीनाने आत्महत्येचाही प्रयत्न केला होता, असं म्हटलं जातं. त्यावर प्रतिक्रिया देताना अजयने ‘पब्लिसिटी स्टंट’ असल्याचं म्हटलं होतं. या मुलाखतीत अजयने रवीनाला मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्याचा सल्लाही दिला होता. “हे प्रत्येकाला माहीत आहे की ती खोटारडी आहे. त्यामुळे तिच्या मूर्खपणाच्या वक्तव्यांचा मला त्रास होत नाही. मात्र यावेळी तिने मर्यादाच ओलांडली आहे. मला तिला सल्ला देण्याची वेळ आली आहे. तिने लवकरात लवकर मानसोपचारतज्ज्ञांकडे जाऊन उपचार घ्यावा. अन्यथा ती मनोरुग्णालयात पोहोचेल”, असं अजयने म्हटलं होतं. अजय देवगणनंतर रवीना आणि अक्षय कुमारचं अफेअर तुफान गाजलं होतं. या दोघांचं नातं जगजाहीर होतं. इतकंच नव्हे तर त्यांनी साखरपुडासुद्धा केला होता. मात्र लग्नाच्या आधीच त्यांचं नातं तुटलं.