Raveena Tandon Daughter Rasha Thadani Dating Life: अभिनेत्री रवीना टंडन हिची लेक राशा थडानी हिने अद्याप बॉलिवूडमध्ये लोकप्रिय अभिनेत्री म्हणून स्वतःचं स्थान पक्क केलं नसलं तरी, राशा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील राशा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. आता राशा हिचं नाव एका लोकप्रिय भारतीय क्रिकेटरसोबत जोडण्यात येत आहे. सध्या ज्या क्रिकेटरसोबत राशाच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, तो क्रिकेटर दुसरा तिसरा कोणी नसून 29 वर्षिय स्पिनर कुलदीप यादव आहे.
सांगायचं झालं तर, राशा थडानी हिची सोशल मीडिया पोस्ट लाईक केल्यामुळे दोघांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. राशा हिने बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि डायना पेंटी हिच्यासोबत काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यांच्या फोटोंवर कुलदीप यादव याने लाईक केलं आहे.
सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवर कुलदीप आणि राशा एकमेकांना फॉलो देखील करतात. सोशल मीडियामुळे राशा आणि कुलदीप यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. पण रंगणाऱ्या चर्चांवर राशा किंवा कुलदीप याने अधिकृत घोषणा केलेली नाही. दोघांनी देखील यावर मौन बाळगलं आहे.
राशा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, राशा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘आझाद’ सिनेमातून राशा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सिनेमात अभिनेता अजय देवगन देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चाहते देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. सिनेमा 17 जानेवारी 2025 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
राशा अद्याप प्रसिद्ध अभिनेत्री नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर राशाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी राशा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी राशा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.