Raveena Tandon ची लेक आणि अजय देवगणचा भाचा यांच्यामध्ये खास कनेक्शन! स्टारकिड्सबद्दल मोठी अपडेट समोर

| Updated on: Jun 12, 2023 | 10:38 AM

बॉलिवूडमध्ये सर्वत्र स्टारकिड्सच्या आयुष्याची चर्चा... रवीनाची लेक आणि अजयच्या भाचा याच्यांतील खास कनेक्शन समोर.. सर्वत्र चर्चांना उधाण

Raveena Tandon ची लेक आणि अजय देवगणचा भाचा यांच्यामध्ये खास कनेक्शन! स्टारकिड्सबद्दल मोठी अपडेट समोर
Follow us on

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटी नाही तर, त्यांच्या मुलांची तुफान चर्चा रंगत आहे. काही स्टारकिड्स मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहेत, तर काही शिक्षणासाठी परदेशात आहेत. एवढंच नाही काही सेलिब्रिटींच्या मुलांनी बॉलिवूडमध्ये करिअर करत वैवाहिक आयुष्याची देखील सुरुवात केली आहे. काही स्टारकिड्सची एन्ट्री अद्याप मोठ्या पडद्यावर झाली नसली तर, सोशल मीडियाच्या माध्यमातून स्टारकिड्स कामय चर्चेत असतात. महत्त्वाचं म्हणजे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसतानाही काही सेलिब्रिटींची मुले तुफान चर्चेत असतात. एवढंच नाही तर, सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आसते. पण आता चर्चा रंगत आहे ती म्हणजे, अभिनेता अजय देवगण याचा भाचा आणि अभिनेत्री रवीना टंडन हिच्या लेकीबद्दल..

अभिनेत्री रवीना टंडन हिची मुलगी राशा थडानी,  अजय देवगण याचा भाचा अमन देवगण याच्यासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. राशा आणि अमन यांच्या जोडीला ‘काय पो चे’ सिनेमाचे दिग्दर्शक अभिषेक कपूर लॉन्च करणार आहेत. ज्यांनी अभिनेत्री सारा अली खान हिला  देखील ‘केदारनाथ’ सिनेमाच्या माध्यमातून मोठा ब्रेक दिला.

एवढंच नाही तर, अभिषेक कपूर यांना राशा आणि अमन यांना हॉटेलमध्ये लंच करताना देखील स्पॉट केलं आहे. एवढंच नाही तर, राशा आणि अमन यांची ट्रेनिंग देखील पूर्ण झाली असून सिनेमाची तयारी सुरु असल्याची चर्चा रंगत आहे. दोघं देखील आगामी सिनेमासाठी प्रचंड उत्सुक आहेत. त्यामुळे राशा आणि अमन सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर राज्य करतील की नाही ने पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

राशा आणि अमन यांच्या सिनेमात ऍक्शन सीक्वेन्स चाहत्यांना पाहायला मिळणार आहेत. सिनेमाच्या निर्मितीची जबाबदारी रॉनी स्क्रूवाला आणि प्रज्ञा कपूर यांच्या खांद्यावर आहे. राशा थडानी सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क करू शकते.. असा अंदाज दिग्दर्शकांनी वर्तवला आहे. महत्त्वाचं म्हणजे अभिनेता अजय देवगण देखील सिनेमात मोठ्या भूमिकेत दिसणार आहे.

रवीनाची मुलगी राशा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, राशाने नुकताच तिचं शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. तर दुसरी कडे अमन याचा भाऊ दानिश बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. दानिश हा चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक आहे. त्याने ‘द बिग बुल’ आणि ‘तान्हाजी’ सारख्या सिनेमांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. सध्या राशा आणि अमन यांच्या आगामी सिनेमाची चर्चा रंगत आहे..

महत्त्वाचं म्हणजे सिनेमात राशा आणि अमन यांच्यामध्ये कोणतं कनेक्शन असेल, सिनेमाची कथा कोणत्या विषया भोवती फिरणारी असले. शिवाय, राशा आणि अमन, अजय यांच्यासोबत सिनेमात अन्य कोणते कलाकार असतील या सर्व गोष्टी गुलदस्त्यात आहेत.