Man Behind Pan India Hit Films: यंदाच्या वर्षी प्रेक्षक फक्त आणि फक्त ‘पुष्पा 2: द रूल’ सिनेमाच्या प्रतीक्षेक होते. सध्या चाहत्यांमध्ये सिनेमाची क्रेझ पाहायला मिळत आहे. 17 नोव्हेंबर रोजी पाटना याठिकाणी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यानंतर सर्वत्र ‘पुष्पा 2: द रूल’ सिनेमाची चर्चा रंगली. सध्या सिनेमा बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे. सांगायचं झालं तर, सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च दरम्यान अभिनेत्री रवीना टंडन हिचा पती देखील त्याठिकाणी उपस्थित होता. रवीनाचा पती अनिल थडानी याचं ‘पुष्पा’, ‘केजीएफ’, ‘बाहुबली’ यांसारख्या हीट सिनेमांसोबत खास कनेक्शन आहे.
सांगितलं जातं की, दाक्षिणात्य सिनेमांना ब्लॉकबास्टर करण्याचं श्रेय फक्त आणि फक्त अनिल थडानी याला जातं. ‘पुष्पा: द राइज’, ‘बाहुबली- द बिग्निंग’, ‘बाहुबली- द कंक्लूजन’, ‘केजीएफ’, ‘केजीएफ 2’ पासून ‘कल्की 2898 एडी’ यांसारखे सिनेमे फक्त आणि फक्त रवीनाच्या पतीमुळे हीट झाले आहे. ज्यामुळे अनिल थडानी यांनी देखील कोट्यवधींची माया कमवली आहे.
अनिल थडानी याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीचा पती फिल्म डिस्ट्रीब्यूटर आहे. AA कंपनी दाक्षिणात्य राज्य म्हणजे दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहार येथील मार्केटमध्ये सिमेमांना डिस्ट्रीब्यूट आणि रिप्रेजेंट करतात. थडानी यांनी 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ये दिल्लगी’ सिनेमातून करियरला सुरुवात केली. त्यानंतर 2015 पासून अनिल थडानी याने दाक्षिणात्य सिनेमांना हिंदी व्हर्जनमध्ये डिस्ट्रीब्यूट करण्यास सुरुवात केली. ज्यामध्ये रवीनाच्या पतीला यश देखील मिळालं.
अनिल थडानीचा पहिला साऊथ सिनेमा होता तो म्हणजे एसएस राजामौलीचा ‘बाहुबली – द बिगिनिंग’. हा सिनेमा संपूर्ण भारतात हिट ठरला आणि तेव्हापासून थडानी सतत दक्षिणेतील सिनेमे यशस्वी करत आहे. मात्र, त्याचे ‘आदिपुरुष’ आणि ‘देवारा – पार्ट वन’ हे दोन दाक्षिणात्य सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले.
सांगायचं झालं तर, रवीना टंडन, अनिल थडानी याची दुसरी पत्नी आहे. 2003 मध्ये रवीना – अनिल यांनी लग्न केलं आणि 2004 मध्ये लग्न केलं. उदयपूर याठिकाणी शाही थाटात दोघांनी लग्न केलं. रवीना – अनिल यांच्या लग्नाला 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. लग्नानंतर अभिनेत्रीने मुलगी राशा थडानी आणि मुलगा रणबीर वर्धन यांना जन्म दिला. आता राशा थडानी ‘आझाद’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.