मुंबई : ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’च्या पर्वाला आजपासून सुरूवात झालीये. 25 फेब्रुवारी 2024 ते 27 फेब्रुवारीपर्यंत हे पर्व सुरू असेल. या कार्यक्रमात नामांकित लोक उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी सर्वांचे स्वागत केले. आज पहिल्याच दिवशी या सत्राला अभिनेत्री रवीना टंडन उपस्थित होती. यावेळी रवीना टंडनने अनेक विषयांवर दिलखुलास चर्चा केली. या तीन दिवसात अजूनही बाॅलिवूड कलाकार या सत्राला उपस्थित असणार आहेत. फक्त बाॅलिवूडच नाही तर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या सत्रात बोलताना रवीना टंडनने मोठे खुलासे हे केले. हेच नाही तर थेट घराणेशाही (नेपोटिझम) वर जाहिरपणे बोलताना देखील रवीना टंडन दिसलीये. रवीना टंडन म्हणाली की, जर तुम्ही नेपो किड्सबद्दल बोलत आहात तर आमचे अर्धे पोलिटिक्स आणि इंडस्ट्री संपेल. पहिल्यांदाच रवीना टंडन घराणेशाहीवर बोलताना दिसली.
मुळात म्हणजे रवीना टंडन हिचे वडील देखील चित्रपट निर्माते होते. रवीना टंडन म्हणाली की, मुळात म्हणजे मुलांच्या संगोपनामध्ये आईचा मोठा वाटा असतो. रवीना पुढे म्हणाली की, मला सुरुवातीच्या काळापासूनच चित्रपटांच्या खूप जास्त ऑफर्स येत होत्या. मात्र, मी सतत चित्रपटांसाठी नकार देत होते. मला अभिनयामध्ये काहीच रस नव्हता.
मुळात म्हणजे मला दिग्दर्शनामध्ये जायचे होते. यामुळेच मी चित्रपटांना नकार देत होते. मी कधीच अभिनयाचा विचार देखील केला नव्हता. सुरूवातीला रवीना टंडनने ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाला देखील नकार दिला होता. मात्र, त्यानंतर ज्यावेळी रवीनाने ही गोष्टी आपल्या मित्रांना सांगितली, त्यावेळी त्यांनी तिला हा चित्रपट साईन करण्यास सांगितले. कारण त्या चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत होता.
सलमान खान याच्यासाठी रवीनाने मैने प्यार किया चित्रपटाला होकार दिला. यासोबतच रवीना टंडन काही मोठे खुलासे करताना दिसली. व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या सत्रात अनेक गोष्टींबद्दल रवीना टंडनने खुलासा केलाय. रवीना टंडनची मुलगी राशा थडानी ही देखील आता लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करण्यास तयार आहे. राशा सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते.