Love Life | ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने पोटच्या मुलांना सांगितली सर्व अफेअर्स, कारण जाणून तुम्हीही म्हणाल…

| Updated on: Oct 01, 2023 | 9:34 AM

Love Life | लग्नाआधी प्रसिद्ध अभिनेत्रीचं अनेक सेलिब्रिटींसोबत नाव जोडण्यात आलं, पण कोणासोबत नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही, अखेर अभिनेत्रीने धरला श्रीमंत उद्योजकाचा हात, मुलीच्या जन्मानंतर स्वतः सांगितली सर्व अफेअर्स... सध्या सर्वत्र बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Love Life | या प्रसिद्ध अभिनेत्रीने पोटच्या मुलांना सांगितली सर्व अफेअर्स, कारण जाणून तुम्हीही म्हणाल...
Follow us on

मुंबई : 1 ऑक्टोबर 2023 | बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर चढत असताना सेलिब्रिटी फक्त त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयु्ष्यामुळे कायम चर्चेत असतात. अशात प्रसिद्धी झोतात आल्यानंतर सेलिब्रिटींच्या लोकप्रियतेत देखील प्रचंड वाढ होते. म्हणून आपल्या आवडत्या सेलिब्रिटींबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. एवढंच नाही तर, सेलिब्रिटी त्यांच्या आयुष्यातील खास व्यक्तीबद्दल देखील चाहत्यांना अनेक गोष्टी सांगत असतात. बॉलिवूडमध्ये असे अनेक कपल आहेत, ज्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं. तर काहींचं मात्र ब्रेकअप झालं. असंच काही बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत देखील झालं आहे. ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्रीने श्रीमंत उद्योजकासोबत लग्न केलं. आज अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे..

सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयु्ष्याबद्दल चर्चा रंगत आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री रवीना टंडन आहे. रवीना हिने अनिल थडानी यांच्यासोबत दोन दशकांपूर्वी लग्न केलं. पण लग्नाआधीच अभिनेत्रीची लोकप्रियता गगनाला भिडली होती. तिच्या खासगी आयुष्याबद्दल देखील अनेक चर्चा रंगलेल्या असायच्या.

नुकताच झालेल्या मुलाखतीत रवीना हिने तिच्या रिलेशनशिपबद्दल स्पष्ट भूमिका मांडली. अभिनेत्री म्हणाली, ‘१९९० मध्ये माझ्याबद्दल अनेक वाईट गोष्टी लिहिण्यात आल्या.’ अशात मुलींनी कोणत्याही गोष्टी चुकीच्या मार्गाने माहिती झाल्यास ते योग्य राहणार नाही… म्हणून खुद्द रवीना हिने तिच्या सर्व रिलेशनशिपबद्दल आई झाल्यानंतर मुलींना सांगितल्या..

रवीना म्हणाली, ‘माझ्या मुली मला जज करतील असं मुळातच मला नको होतं. त्यांना गोष्टी मी स्वतःहून सांगितल्या ज्यामुळे त्यांना सामोरे जायला त्यांना कठीण वाटणार नाही. मी मुलींना माझ्या सर्व रिलेशनशिपबद्दल सांगितलं आहे. त्यांच्यापर्यंत कोणतीही चुकीची गोष्ट पोहोचू नये असं मला वाटतं…’

‘माझ्या मुलींना सर्व सत्य माहिती आहे. त्यामुळे मला काहीही फरक पडत नाही, माझ्याबद्दल लोकांमध्ये काय चर्चा सुरु आहेत. माझ्या मुली मला समजून घेतात.’ असं देखील रवीना टंडन म्हणाली. सध्या सर्वत्र रवीना टंडन आणि तिच्या खासगी आयु्ष्याची चर्चा रंगली आहे.

रवीना हिच्या मुलींबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने लग्नाआधी दोन मुली दत्तक घेतल्या. रवीना हिने दत्तक घेतलेल्या मुली आज त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत. तर लग्नानंतर रवीना हिने मुलीला जन्म दिला. रवीना हिच्या मुलीचं नाव राशा थडानी आहे. राशा देखील आईच्या पाऊलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.