Ravindar and Mahalakshmi : दाक्षिण सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री महालक्ष्मी कायम तिच्या लग्नामुळे चर्चेत असते. अभिनेत्रीने निर्माता रविंद्र चंद्रशेखरन (Ravindar chandrasekaran) यांच्यासोबत लग्न केलं आहे. रविंद्र चंद्रशेखरन यांच्यासोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. लग्नानंतर नुकताच दोघांनी अमेरिकेत हनीमून साजरा केला. हनीमूननंतर दोघे तामिळनाडू येथील तिरुचेंदूर मंदिरात दर्शनासाठी पोहोचले. सध्या दोघांचे मंदिरातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये महालक्ष्मी प्रचंड सुंदर दिसत आहे.
महालक्ष्मीच्या काही चाहत्यांनी फोटोंना पसंती दर्शवली आहे, तर काहींनी मात्र दोघांना पुन्हा ट्रोल केलं आहे. एवढंच नाही, तर अनेकांनी महालक्ष्माली गोल्डन डिगर देखील म्हटलं आहे. दरम्यान, अभिनेत्री लाईव्ह येवून ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. लाईव्ह येवून अभिनेत्री पतीचा अपमान न करण्याचं आवाहन केलं.
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘माझे पती लठ्ठ असल्यामुळे तुम्ही त्यांना ट्रोल करत आहात. लोक सतत कमेंट करतात. तुमच्या कमेंटमुळे आम्हाला दोघांना प्रचंड दुःख होतं..’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सर्वत्र महालक्ष्मी आणि पती रविंद्र चंद्रशेखरन यांच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.
दरम्यान, रविंद्र चंद्रशेखरन यांच्यासोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्रीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं. नेटकऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्रीवर निशाणा साधला. पहिलं लग्न अपयशी ठरल्यानंतर महालक्ष्मीने रविंद्र चंद्रशेखरन यांच्यासोबत लग्न केलं. लग्नाची झाल्याची माहिती अभिनेत्रीने चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. पण फोटो व्हायरल झाल्यानंतर तिला ट्रोल करण्यात आलं.
मीडियारिपोर्टनुसार महालक्ष्मी आणि रविंद्र ओळख यांची ओळख ‘विदियुम वरई काथिरु’ या सिनेमात झाली. सिनेमाच्या सेटवरच दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतरप प्रेमात झालं. अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता दोघे वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहेत. दोघांच्या नात्याच्या चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगत असतात.