रवींद्र जडेजाने कोणाला म्हटलं बॉलिवूडमधली सर्वांत सेक्सी अभिनेत्री? क्रिकेटरशी जोडलं गेलंय तिचं नाव

| Updated on: Jan 07, 2025 | 2:19 PM

क्रिकेटर रवींद्र जडेजाने एका मुलाखतीत त्याला आवडणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटीचं नाव घेतलं. फिल्म इंडस्ट्रीत ती सर्वांत सेक्सी अभिनेत्री आहे, असंही त्याने म्हटलंय. जडेजाची ही मुलाखत सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.

रवींद्र जडेजाने कोणाला म्हटलं बॉलिवूडमधली सर्वांत सेक्सी अभिनेत्री? क्रिकेटरशी जोडलं गेलंय तिचं नाव
Ravindra Jadeja
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : बॉलिवूड आणि क्रिकेटचं कनेक्शन नेहमीच अनेकांचं लक्ष वेधून घेतं. बऱ्याच क्रिकेटर्सची नावं बॉलिवूड अभिनेत्रींशी जोडली गेली आहेत. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही सर्वाधिक लोकप्रियता मिळवलेली जोडी आहे. काहींच्या नात्याचा प्रवास लग्नापर्यंत पोहोचला. तर काहींचं नातं फार काळ टिकलं नाही. क्रिकेटर आणि अभिनेत्रींच्या अशाही काही जोड्या आहेत, ज्यांच्या अफेअरच्या चर्चा आजही सोशल मीडियावर चवीने चघळल्या जातात. अशातच प्रसिद्ध क्रिकेटर रवींद्र जडेजाने एका मुलाखतीत त्याच्या आवडत्या बॉलिवूड सेलिब्रिटीचं नाव घेतलं आहे. या अभिनेत्रीला त्याने फिल्म इंडस्ट्रीतील सर्वांत सेक्सी अभिनेत्री असंही म्हटलंय.

एका मुलाखतीत रवींद्र जडेजाला त्याची आवडती बॉलिवूड अभिनेत्री कोण असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने उर्वशी रौतेलाचं नाव घेतलं. उर्वशी ही बॉलिवूडची सर्वांत सेक्सी अभिनेत्री असल्याचंही त्याने म्हटलं. रवींद्र जडेजाची ही मुलाखत सध्या चर्चेत आली आहे. उर्वशीचं नाव क्रिकेटर ऋषभ पंतशी जोडलं गेलंय, हे सर्वश्रुत आहे. हे दोघं एकमेकांना डेट करत नसले तरी उर्वशी आणि ऋषभला चाहते एकमेकांच्या नावाने चिडवतात.

हे सुद्धा वाचा

उर्वशी आणि ऋषभ एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. मात्र नंतर सोशल मीडियावर दोघांनी अप्रत्यक्षपणे एकमेकांना टोमणे मारले. उर्वशीने एका मुलाखतीत आरपीचा (RP) उल्लेख केला होता. तो आरपी ऋषभ पंतच असावा, असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला होता. त्यानंतर सोशल मीडियावर ऋषभ आणि उर्वशी यांच्यात अप्रत्यक्षपणे वाद झाला. या दोघांमधील वाद जगजाहीर आहे.

ऋषभच्या अपघातानंतर उर्वशी पुन्हा एकदा चर्चेत आली होती. उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयाच्या इमारतीचा फोटो पोस्ट केला होता. त्याच रुग्णालयात ऋषभवर उपचार सुरू होते.