पुणे | मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७७ व्या वर्षी रवींद्र महाजनी यांनी अखेरचा श्वास घेतला. पण त्यांचं निधन का झालं? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. फक्त चाहतेच नाही तर, संपूर्ण सिनेविश्वाला रविंद्र महाजनी यांच्या निधनानंतर मोठा धक्का बसला आहे. रवींद्र महाजनी पुण्यात ऐकटेच राहत होते. रवींद्र महाजनी यांचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आता रवींद्र महाजनी यांचा शेवटाचा फोटो समोर येत आहे. बंद खोली, पिवळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये जमिनीवर पडलेल्या रवींद्र महाजनी यांना पाहून प्रत्येकाला मोठा थक्का बसला आहे. सध्या सर्वत्र रवींद्र महाजनी यांच्या निधनाची चर्चा रंगत आहे.
रवींद्र महानजी यांचा शेवटचा फोटो समोर आल्यानंतर सर्वांना मोठा धक्का बसला आहे. रवींद्र महाजनी यांचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता. धक्कादायक गोष्ट म्हणजे दोन दिवसांपासून मृतदेह बंद खोलीत असल्यामुळे चेहरा पूर्ण काळा पडला होता. खोली देखील अस्ताव्यस्त होती. शेवटच्या क्षणी रवींद्र महाजनी यांनी पिवळ्या रंगाचा टी-शर्ट घातला होता.
सांगायचं झालं तर, रवींद्र महाजनी पुण्यात ऐकटेच राहत होते. त्यांची पत्नी आणि मुलगा गश्मिर महाजनी मुंबईत राहतात. रवींद्र महाजनी राहत असलेल्या सदनिकेतून अचानक दुर्गंधी येऊ लागल्याने रहिवाशांनी याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला तेव्हा रवींद्र महाजनी मृतावस्थेत आढळले. आता रविंद्र यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पोहोचला आहे. आता शवविच्छेदानंतर मृत्यूचं खरं कारण समोर येईल.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार रविंद्र महाजनी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पण त्यांच्या पत्नीची प्रकृती ठिक नसल्यामुळे त्यांना अद्याप सांगितले नाही. शिवाय रविंद्र महाजनी यांच्यावर अंत्यसंस्कार कुठे होणार हे देखील अद्याप समोर आलेलं नाही. रवींद्र महाजनी यांच्या निधनाने सर्वत्र खळबळ माजली आहे.
मराठी सिनेसृष्टीतील रुबाबदार, देखणा नट म्हणून रवींद्र महाजनी यांची ओळख होती. १९७५ ते १९९० या काळात यांनी मराठी सिनेसृष्टी गाजवून सोडली. त्यांनी केलेले सिनेमेही चांगलेच गाजले. मुंबईचा फौजदार, देवता, झुंज, आराम हराम आहे. लक्ष्मी, लक्ष्मीची पावलं, गोंधळात गोंधळ आदी सिनेमे चांगलेच गाजले. तर बेलभंडार आणि अपराध मीच केला ही त्यांची नाटकेही गाजली.